Ankush Panghal Confirms medal In Boxing
अंकुश पंघालने उपांत्यपूर्व फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. तीन फेऱ्यांच्या या लढतीत त्याने सुरुवातीपासूनच ताजिकिस्तानच्या बॉक्सरवर वर्चस्व गाजवले.तर दुसरीकडे सलीमोव्हला भारतीय बॉक्सरसोबत बरोबरी साधण्यासाठी संघर्ष करावा लागला. अंकुशने पहिली फेरी ५-० अशा फरकाने जिंकली. दुसऱ्या फेरीत, अंकुशने आणखी आक्रमकता दाखवत सलग पंच मारले. त्याने आपला शक्तिशाली लेफ्ट हुक दाखवला आणि अटॅक करत ५-० असा विजय मिळवला. नॉकडाऊन करण्यासाठी आतुर झालेल्या सलीमोव्हने अंतिम फेरीत पुनरागमन केले. त्याने अंकुशवर काही पंच मारले, पण भारतीय बॉक्सरने आपला डिफेन्स कायम ठेवला पण, ताजिक बॉक्सरने तिसरी फेरी ४-१ ने जिंकली. परंतु, अंकुशने पहिल्या दोन फेऱ्या एकमताने जिंकत ही लढत सहज जिंकली. विशेष बाब म्हणजे, अंकुश पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये खेळत आहे.
अंकुश पंघालने गेल्या काही वर्षांमध्ये ८० किलो वजनी गटात अनेक विक्रम केले आहेत. हरियाणात जन्मलेल्या अंकुशने वयाच्या ११ व्या वर्षी बॉक्सिंगला सुरुवात केली. त्याने २०२५ च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये रौप्य पदक जिंकले. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. तो आता भारतीय बॉक्सिंगमधील यशस्वी बॉक्सरपैकी एक आहे.
भारताने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण, १२ रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह एकूण ३० पदके जिंकली आहेत. २६ सप्टेंबर रोजी भारतीय महिला संघाच्या विजयानंतर, पुरुष संघाने इराणला ४०-३४ ने हरवून कबड्डीमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. जोशना चिन्नप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांनी स्क्वॉशमध्ये कांस्यपदके जिंकली. सावन बरवालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान पटकावले, ज्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील या प्रकारात भारताचे हे चौथे पदक ठरले.






