Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक-दोन नव्हे, तब्बल 20 Goal! दीपिकाच्या गोलवर्षावाने थायलंडला रडवलं; Asian Games 2026 मध्ये भारताची विजयी हॅट्ट्रिक

Indian Women Hockey beat Thailand by 20-1 in asian games: भारतीय महिला हॉकी संघाने आशिया क्रीडा स्पर्धेत थायलंडचा २०-१ ले धुव्वा उडवला. भारताने सलग तीन सामने जिंकून हॅट्ट्रीक लगावली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 03:56 PM
India beat thailand by 20-1 in asian games

India beat thailand by 20-1 in asian games

Follow Us
Follow Us:
  • २० गोलांचा तुफान अन् थायलंडची दाणादाण
  • भारतीय महिला हॉकीचा सलग तिसरा विजय
  • दीपिकाने केला गोलांचा विक्रम
आशियाई क्रीडा २०२६ (Asian games 2026) मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम आहे. उझबेकिस्तान आणि इंडोनेशियाला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाने थायलंडचाही धुव्वा उडवत आपला सलग तिसरा दणदणीत विजय नोंदवला. बुधवारी खेळल्या गेलेल्या पूल बी च्या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत थायलंडला २०-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. ६० मिनिटे चाललेल्या या एकतर्फी सामन्यावर भारतीय संघाचे पूर्णपणे वर्चस्व होते.या सामन्यात दीपिका सेहरावतने नऊ गोल करून भारतासाठी सर्वाधिक गोल केले. नवनीत कौरने चार, ऋतुजा पिसाळने तीन, तर लालरेम्सियामी, नेहा, साक्षी आणि सलीमा यांनी प्रत्येकी एक गोल केला.

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

दीपिकाने स्वतःचाच विक्रम मोडला

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये ५६ गोल केले आहेत. दीपिकाने स्वतःचाच विक्रम मोडून आशियाई क्रीडा स्पर्धेतील एकाच महिला हॉकी सामन्यात सर्वाधिक गोल करणारी खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी, दीपिकाने उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आठ गोल केले होते. भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने यापूर्वी उझबेकिस्तान आणि इंडोनेशियाला पराभूत केले आहे. त्यांचा पुढील सामना २५ सप्टेंबर रोजी जपानशी होईल.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला दीपिका सेहरावतने भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चौथ्या मिनिटाला नवनीत कौरने ही आघाडी दुप्पट केली. त्यानंतर दीपिकाने ८व्या आणि ९व्या मिनिटाला सलग गोल केले. भारतीय खेळाडूंनी गोल करणे सुरूच ठेवले आणि थायलंडसमोर गोलांचा डोंगर उभा केला. याशिवाय,अनुभवी मिडफिल्डर नेहा (१९व्या मिनिटाला), लालरेम्सियामी (२६व्या मिनिटाला), साक्षी राणा (२९व्या मिनिटाला) आणि कर्णधार सलीमा टेटे (४५व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

पहिल्या तीन क्वार्टर्समध्ये भारतीय संघाचे वर्चस्व इतके होते की थायलंडला एकही गोल करता आला नाही. मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये थायलंडने आपले खाते उघडले. सामना संपण्याच्या काही वेळ आधी थायलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ५७ व्या मिनिटाला सुपांसा सामान्सोने थायलंडसाठी एकमेव गोल केला. भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत २०-१ असा एकतर्फी विजय मिळवला.

भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर गाजवले वर्चस्व

भारतीय संघ संपूर्ण सामन्यात आक्रमकपणे खेळला आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. शानदार अटॅक आणि उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर भारताने सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले आणि प्रतिस्पर्धी संघाला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. चौथ्या क्वार्टरच्या अखेरीस थायलंडला एक गोल करण्यात यश आले. पेनल्टी कॉर्नरवर सुपंसा समन्सूच्या ड्रॅग-फ्लिकने चेंडू किंचित भारतीय गोलमध्ये वळवला, ज्यामुळे थायलंडला सामन्यातील एकमेव गोल मिळाला. भारताचा हा विजय ‘पूल बी’ मधील तिसरा विजय होता. यापूर्वी, संघाने इंडोनेशियाला १७-१ ने पराभूत केले होते.

भारताने २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले कांस्य

भारतीय महिला हॉकी संघाने २०२३ च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते, पण यावेळी संघाचे लक्ष्य सुवर्णपदकावर आहे. भारताने १९८२ मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीमधील पहिले सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून भारत आपल्या दुसऱ्या सुवर्णपदकाच्या प्रतीक्षेत आहे.

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

Web Title: Asian games 2026 indian women hockey thailand 20 1 win deepika scores 9 goals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Indian hockey team
  • Thailand vs India

संबंधित बातम्या

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय
1

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
2

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…
3

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक
4

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.