Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Champions Trophy : भारताचा विक्रमी षटकार! जपानला 4-1 ने नमवत सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले

Asian Champions Trophy : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा 4-1 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावले आणि सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 06, 2026 | 03:57 PM
Asian Champions Trophy : भारताचा विक्रमी षटकार! जपानला 4-1 ने नमवत सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले

Asian Champions Trophy : भारताचा विक्रमी षटकार! जपानला 4-1 ने नमवत सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले

Follow Us
Follow Us:
  • तिसऱ्याच मिनिटाला जपानची आघाडी
  • भारताचे जोरदार पुनरागमन
  • जपानच्या बचावफळीवर सातत्याने दबाव
 

Asian Champions Trophy : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा 4-1 असा धुव्वा उडवत विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने यापूर्वी 2011, 2016, 2018, 2023 आणि 2024 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

ऑलिम्पियन बलबीर सिंग सीनियर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत जपानने तिसऱ्याच मिनिटाला काझुमासा मात्सुमोतो याच्या मैदानी गोलच्या जोरावर आघाडी घेतली. त्याने टोमहॉक फटक्यावर अप्रतिम गोल करत भारतीय संघाला धक्का दिला. पहिल्या सत्रात भारताला गोल करण्यात अपयश आले. 20 व्या मिनिटाला जपानला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले; मात्र भारतीय बचावफळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.

दुसऱ्या सत्रात भारताची दमदार कामगिरी

भारताकडून जरमनप्रीत सिंगने बचावफळीत भक्कम कामगिरी केली. मध्यंतरापर्यंत 0-1 अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सत्रात सामन्याचे चित्रच पालटले.

33व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र कर्णधार हरमनप्रीतसिंगचा फटका जपानचा गोलरक्षक किशो कुरोदा याने अडवला. 39व्या मिनिटाला जपानलाही पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु शोता यामादा याचा प्रयत्न अपयशी ठरला.

Kabaddi: कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगरची बाजी! पुणे जिल्ह्याला मिळाला ‘हा’ क्रमांक

जपानच्या बचावफळीवर सातत्याने दबाव

भारतीय संघाने जपानच्या बचावफळीवर सातत्याने दबाव कायम ठेवला. 42व्या मिनिटाला मिळालेल्या सलग दोन पेनल्टी कॉर्नरपैकी एका संधीवर शिलानंद लाकडा याने आदित्य अर्जुन लालागेच्या पासवर रिबाउंडद्वारे गोल केला आणि भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

यानंतर 48व्या मिनिटाला हार्दिकच्या अचूक पासवर दिलप्रीत सिंगने रिव्हर्स हिटद्वारे गोल करत भारताला 2 – 1 अशी आघाडी मिळवून दिली. आघाडी मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास आणखी वाढला.

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…

53व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताची आघाडी 3-1 अशी केली. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात विवेक सागर प्रसादने सर्कलच्या वरून जोरदार फटका मारत चौथा गोल नोंदवला. अखेरच्या क्षणी जपानला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र कर्णधार राइकी फुजिशिमा याचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला. अखेर भारताने 4-1 असा दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने कोणाला पराभूत केले?

    Ans: भारताने अंतिम सामन्यात जपानचा 4-1 असा पराभव केला.

  • Que: भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी कितव्यांदा जिंकली?

    Ans: भारताने विक्रमी सहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

  • Que: भारताकडून अंतिम सामन्यात कोणी गोल केले?

    Ans: शिलानंद लाकडा, दिलप्रीतसिंग, जुगराजसिंग आणि विवेक सागर प्रसाद यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Web Title: India beat japan win record sixth asian champions trophy rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Hockey
  • Indian hockey team
  • Japan

संबंधित बातम्या

Asian Para Games : पॅरा खेळाडूंचा ऐतिहासिक पराक्रम! पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला साधणार संवाद
1

Asian Para Games : पॅरा खेळाडूंचा ऐतिहासिक पराक्रम! पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला साधणार संवाद

QUAD : भारतासह चार देशांची मोठी रणनीती! AI, महत्त्वपूर्ण खनिजे आणि समुद्री सुरक्षेसाठी करणार सहकार्य
2

QUAD : भारतासह चार देशांची मोठी रणनीती! AI, महत्त्वपूर्ण खनिजे आणि समुद्री सुरक्षेसाठी करणार सहकार्य

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात
3

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.