Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

Kumkum Kirti Ankita Won Gold in Archery Recurve Asian Games: भारतीय महिला तिरंदाजी संघाने रिकर्व्ह प्रकारात कुमकुम, अंकिता आणि कीर्ती या त्रिकुटाने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 02, 2026 | 02:15 PM
Kumkum Kirti Ankita Won Gold in Archery

Kumkum Kirti Ankita Won Gold in Archery

Follow Us
Follow Us:
  • कुमकुम-अंकिता-कीर्तीने रचला इतिहास
  • रिकर्व्ह महिला टीम इव्हेंटमध्ये भारताला पहिले गोल्ड
  • ४८ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
भारतीय महिला तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा २०२६ मधील ( Asian Games 2026) रिकर्व्ह प्रकारात इतिहास रचला. भारताने अंतिम सामन्यात १० वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाला ५-३ ने पराभूत करून महिलांच्या सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात प्रथमच सुवर्णपदक जिंकले. कुमकुम मोहाड, अंकिता भाकत आणि कीर्ती या त्रिकुटाने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पहिले दोन सेट बरोबरीत सुटल्यानंतर, भारताने तिसऱ्या सेटमध्ये दक्षिण कोरियाच्या महिला तिरंदाजी संघाला पराभूत करून सुवर्णपदकार नाव कोरले.

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य

दोन्ही सेटमध्ये अटीतटीची लढाई

भारतीय महिला तिरंदाजी संघाने उपांत्य फेरीत चीनला ५-१ ने पराभूत करून पहिल्यांदाच रिकर्व्ह प्रकारातील सुवर्णपदकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक असलेल्या, १० वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाशी झाला. भारतासाठी हे आव्हान सोपे नव्हते, परंतु कुमकुम, कीर्ती आणि अंकिता यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या दोन सेटमध्ये कोरियन संघाला कडवी झुंज दिली. यामुळे पहिले दन सेट बरोबरीत सुटले.

पहिला सेट अत्यंत रोमांचक होता, ज्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी ५४ गुण मिळवले. त्यानंतर भारतीय त्रिकुटाने दुसऱ्या सेटमध्येही आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. दुसरा सेट देखील ५६-५६ असा बरोबरीत संपला, त्यामुळे दुसऱ्या सेटच्या शेवटी दोन्ही संघ बरोबरीत राहिले.

तिसरा सेट जिंकून भारताने सुवर्णपदक पटकावले

भारतीय महिला रिकर्व्ह संघासाठी तिसरा सेट निर्णायक ठरला. कुमकुम, कीर्ती आणि अंकिता यांनी दक्षिण कोरियाच्या विश्वविजेत्या कांग चेयॉन्ग, ओह येजिन आणि ली युनजी यांच्या संघावर दबाव आणला. कीर्तीने भारतासाठी सुरुवातीलाच ८ गुण मिळवले. याचे तिने नंतर निर्णायक ९ गुणांमध्ये रूपांतर केले. भारताने तिसरा सेट ५५-५२ असा जिंकून सामन्यात ४-२ अशी आघाडी घेतली.

त्यानंतर चौथ्या आणि निर्णायक सेटमध्ये कोरियन संघाने या सेटमध्ये ५४ गुण मिळवले होते. त्यामुळे सुवर्णपदक मिळवण्यासाठी भारताला हा सेट किमान बरोबरीत सोडवणे आवश्यक होते. भारतीय त्रिकुटाने दबावाखाली उत्कृष्ट कामगिरी करत चौथा सेट बरोबरीत सोडवला आणि सामना ५-३ ने जिंकला. या विजयासह, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात आपले पहिले सुवर्णपदक पटकावले.

THE GOLD-WINNING TEAM INDIA 🥇🥹 – Defeats multiple-time Olympic champions South Korea 🇰🇷 in the Final
– Wins India’s first-ever Gold in the Women’s Recurve Team event at the Asian Games
The trio of Kirti, Ankita & Kumkum does it!!!! ASIAN GAMES CHAMPIONS IN THE WOMEN’S… pic.twitter.com/yZLzIq8ZrJ — The Khel India (@TheKhelIndia) October 2, 2026

भारताने ४८ वर्षांचा विक्रम मोडला

आशियाई क्रीडा महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात दक्षिण कोरियाने दीर्घकाळ वर्चस्व गाजवले आहे. १९७८ च्या बँकॉक येथील स्पर्धेत जपानने सुवर्णपदक जिंकले, तर दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. त्यानंतर, दक्षिण कोरियाने १९८२ मध्ये नवी दिल्लीपासून ते २०२२ मध्ये हांगझूपर्यंत या प्रकारात अनेक वेळा सुवर्णपदके जिंकली आहेत.

भारताने २०१० च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात प्रथम कांस्य पदक जिंकले होते. आयची-नागोया आशियाई क्रीडा २०२६ च्या स्पर्धेत,  ४८ वर्षानंतर, कुमकुम, अंकिता आणि कीर्ती या भारतीय त्रिकुटाने दक्षिण कोरियाला पराभूत करून या प्रकारात पहिले सुवर्ण पदक जिंकले.

 

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

Web Title: Asian games 2026 kumkum ankita kirti archery recurve gold medal pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • archery
  • asian games 2026
  • gold medal

संबंधित बातम्या

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य
1

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य

Asian Games 2026: लवलीना बोरगोहेनच्या वाढदिवसाचं गिफ्ट, मेरी कॉमच्या 12 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी; ऐतिहासिक सुवर्णपदक
2

Asian Games 2026: लवलीना बोरगोहेनच्या वाढदिवसाचं गिफ्ट, मेरी कॉमच्या 12 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी; ऐतिहासिक सुवर्णपदक

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल
3

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास
4

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.