Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओडिशा AM/NS इंडियाचा डंका! ४ सुवर्णांसह ११ पदकांची कमाई

CBSE National Gymnastics Championship 2026 Odisha AM/NS India: पुण्यात आयोजित CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ओडिशा AM/NS इंडियाच्या १३ खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 13, 2026 | 10:03 PM
CBSE National Gymnastics Championship 2026

CBSE National Gymnastics Championship 2026

Follow Us
Follow Us:
  • जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओडिशा AM/NS इंडियाची चमकदार कामगिरी
  • राष्ट्रीय स्पर्धेत ११ पदकांवर कोरले नाव
  • प्रीती झंकार आणि रोज मिन्झीची सुवर्णकामगिरी
मुंबई : महाराष्ट्रातील पुणे येथे पार पडलेल्या CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ओडिशा AM/NS इंडियाच्या युवा जिम्नॅस्ट्सनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत भुवनेश्वर जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर आणि ओडिशा इंडिया जिम्नॅस्टिक्स राउरकेला येथील ग्रासरूट सेंटरच्या एकूण १३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या खेळाडूंनी विविध शाळांचे प्रतिनिधित्व केले. देशभरातून सहभागी झालेल्या ३५० हून अधिक खेळाडूंमध्ये ओडिशाच्या जिम्नॅस्ट्सनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले.

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

या स्पर्धेत, १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रीती झंकारने प्रतिनिधित्व केले. तर १४ वर्षांखालील गटात सुभिदिता बाग, शौम्यश्री प्रियदर्शिनी आणि जास्मिन प्रहराज यांनी स्पर्धेत भाग घेतला. तर, रोज मिन्झीने ११ वर्षांखालील मुलींच्या गटात सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे, राउरकेला येथील ओडिशा जिम्नॅस्टिक्स ग्रासरूट सेंटरच्या खेळाडूंनी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या सेंटरकडून अद्विन नाग आणि प्रणबजैन महाला यांनी ११ वर्षांखालील मुलांच्या गटात , अदरिशा कोठारी १४ वर्षांखालील मुलींच्या गटात, तर प्रिया बडाईक, रिमझिम सिल, पंकुरी सिल, अद्याशा पात्रा आणि बिद्यांका बेहरा यांनी ११ वर्षांखालील मुलींच्या गटात सहभाग घेतला होता.

प्रीती झंकार आणि रोज मिन्झीची सुवर्णकामगिरी

स्पर्धेतील पदकतालिकेत ओडिशाच्या खेळाडूंनी प्रभावी उपस्थिती नोंदवली. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रीती झंकारने ऑल-अराउंड आणि बॅलन्स बीम या दोन्ही प्रकारांत अव्वल स्थान मिळवत दोन सुवर्णपदके जिंकली.

११ वर्षांखालील मुलींच्या गटात रोज मिन्झीनेही अशीच चमकदार कामगिरी केली. तिने ऑल-अराउंड आणि बॅलन्स बीममध्ये सुवर्णपदके पटकावली, तर फ्लोअर एक्सरसाइज प्रकारात रौप्यपदक मिळवले. १४ वर्षांखालील गटात शौम्यश्री प्रियदर्शिनीने बॅलन्स बीममध्ये रौप्य आणि वॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकले. याच वयोगटातील सुभिदिता बागने अनइव्हन बार्स आणि वॉल्ट या प्रकारांत दोन रौप्यपदके मिळवली. दरम्यान, ग्रासरूट सेंटरच्या प्रणबजैन महालाने ११ वर्षांखालील मुलांच्या गटातील पॅरलल बार्स प्रकारात कांस्यपदक पटकावले.

युवा खेळाडूंच्या यशाचा अभिमान- आशुतोष तेलंग

खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना AM/NS इंडियाचे संचालक तथा मानव संसाधन व प्रशासन विभागाचे उपाध्यक्ष आशुतोष तेलंग यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये आमच्या खेळाडूंनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. या कामगिरीतून त्यांची मेहनत, खेळाप्रती असलेली निष्ठा, शिस्त आणि जिद्द दिसून येते. राउरकेला येथील ग्रासरूट सेंटरच्या खेळाडूंनी पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध केली, ही आनंदाची बाब आहे. तर हाय परफॉर्मन्स सेंटरच्या खेळाडूंनी पदकांच्या माध्यमातून आपल्या प्रशिक्षणाची आणि कौशल्याची गुणवत्ता दाखवून दिली आहे. क्रीडा क्षेत्रातील नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि सुरुवातीच्या प्रशिक्षणापासून उच्चस्तरीय कामगिरीपर्यंत खेळाडूंना आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी AM/NS इंडिया सातत्याने प्रयत्नशील आहे.”

ओडिशा AM/NS इंडिया जिम्नॅस्टिक्स सेंटर

आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS India) यांनी भारतात जिम्नॅस्टिक्स या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ओडिशाला जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी ओडिशा सरकारसोबत भागीदारी केली आहे.

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये, ओडिशा AM/NS इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर (Odisha AM/NS GHPC) आहे. 2023 मध्ये याची सुरुवात झाली होती. या केंद्रात ‘एलिट जिम्नॅस्टिक्स कार्यक्रम’ अंतर्गत प्रतिभावान खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, राज्यभरात तीन ओडिशा AM/NS इंडिया जिम्नॅस्टिक्स ग्रासरूट सेंटर कार्यरत असून, त्याद्वारे युवा खेळाडूंची ओळख करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.

AM/NS इंडिया आपल्या ‘उडान’ या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत दरवर्षी 450 जिम्नॅस्ट्सना प्रशिक्षण देते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून या खेळाडूंना उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळते.

ओडिशा AM/NS GHPC मधील खेळाडूंनी लिस्बन येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्टिनेंटल कप 2026, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2025, तुर्कियेतील अंताल्या येथे झालेला FIG वर्ल्ड कप 2025 आणि आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, अशा प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत या सेंटरमधील खेळाडूंनी विवध स्पर्धांमध्ये 400 हून अधिक पदके जिंकली आहेत.

या सर्वसमावेशक कार्यक्रमांतर्गत खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षणासोबतच शैक्षणिक सहकार्य आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव दिला जातो. जागतिक स्तरावर खेळाडूंना तयार करण्यासाठी कुशल प्रशिक्षक, ट्रेनर आणि सहाय्यक कर्मचारी घडवण्यावरही भर दिला जातो. हे केंद्र जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (GFI), स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) आणि ओडिशा जिम्नॅस्टिक्स असोसिएशन (OGA) यांसारख्या प्रमुख क्रीडा संस्थांसोबत जवळून काम करते.

आधुनिक स्पोर्ट्स सायन्स सुविधा, विशेष पोषण आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच नियोजनबद्ध प्रतिभा शोध शिबिरांच्या माध्यमातून खेळाडूंच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रशिक्षणासोबतच FIG कोचेस ट्रेनिंग प्रोग्राम, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि विशेष प्रशिक्षण शिबिरांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा कार्यक्रमांसाठीही हे केंद्र एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून विकसित झाले आहे.

IND vs NZ: किवींचा कहर अन् टीम इंडियाची शरणागती! बॅटिंग-बॉलिंग दोन्ही फ्लॉप; ODI क्रिकेटमध्ये भारताच्या नावे नकोसा विक्रम

Web Title: Cbse national gymnastics championship 2026 odisha amns india won 11 medals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • gold medal
  • gymnastics
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

Suryakumar Yadav: ‘पहिले दोन महीने तर..’; टीम इंडियाबाहेर असल्याच्या दु:खावर सूर्यकुमारने सोडले मौन
2

Suryakumar Yadav: ‘पहिले दोन महीने तर..’; टीम इंडियाबाहेर असल्याच्या दु:खावर सूर्यकुमारने सोडले मौन

Rinku Singh Wedding: शुभमंगल सावधान! भारताचा स्टार खेळाडू अडकणार विवाहबंधनात, कुठे आणि केव्हा होणार लग्न?
3

Rinku Singh Wedding: शुभमंगल सावधान! भारताचा स्टार खेळाडू अडकणार विवाहबंधनात, कुठे आणि केव्हा होणार लग्न?

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
4

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.