Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

Mirabai chanu won silver medal in Asian games 2026: भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 01:26 PM
Mirabai chanu won silver medal

Mirabai chanu won silver medal

Follow Us
Follow Us:
  • मीराबाई चानूची ऐतिहासिक ‘लिफ्ट’
  • एशियन गेम्समध्ये पहिल्यांदा जिंकलं रौप्यपदक
  • २८ वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये पदक
Mirabai chanu won silver medal in asian games 2026: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने आशियाई क्रीडा स्पर्धेत ( Asian Games 2026) इतिहास रचला आहे. मीराबाईने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात एकूण १९८ किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. हे मीराबाईचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक आहे. २८ वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मिळालेले हे पहिले आशियाई क्रीडा पदक आहे.

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मीराबाईने रौप्यपदक जिंकून रचला इतिहास

मीराबाई चानूची अंतिम लढत खूपच चुरशीची आणि रोमांचक होती. उत्तर कोरियाची दिग्गज वेटलिफ्टर री सॉन्ग गमने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. मीराबाईने स्नॅचमध्ये ८३ किलोने सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात ८५ किलो उचलले. यानंतर तिने तिसऱ्या प्रयत्नात ८७ किलो यशस्वीरित्या उचलले. स्नॅचनंतर ती पदकाच्या शर्यतीत जोरदारपणे टिकून राहिली. मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये १०७ किलोच्या यशस्वी प्रयत्नाने सुरुवात केली. यानंतर तिने दुसऱ्या प्रयत्नात १११ किलो उचलले. तिसऱ्या प्रयत्नाची गरज भासली नाही आणि तिचा एकूण स्कोर १९८ किलो होता. मीराबाईने ८७ किलो स्नॅच आणि १११ किलो क्लीन अँड जर्कसह एकूण १९८ किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले.

उत्तर कोरियाच्या री सॉन्ग गमने जिंकले सुवर्णपदक

उत्तर कोरियाच्या री सॉन्ग गमने एकूण २१५ किलो वजनासह सुवर्णपदक पटकावले. तिने स्नॅचमध्ये ९४ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १२१ किलो वजन उचलले. इंडोनेशियाच्या विजयाना लुलुक डायना त्रिने एकूण १९१ किलो वजनासह कांस्यपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०३ किलो वजन उचलले.

२८ वर्षांनंतर एशियन गेम्समध्ये भारताला पदक

मीराबाईच्या रौप्यपदकामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग पदकासाठी भारताची प्रतीक्षा संपली. यापूर्वी, भारताने १९९८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीच्या माध्यमातून वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले होते. यानंतर भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळात कोणतेही पदक मिळाले नव्हते. आता मीराबाईने २८ वर्षांनंतर हा दुष्काळ संपवला आहे.

मीराबाईने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच जिंकले पदक

मीराबाई चानूने २०१४ मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि नववे स्थान पटकावले. पाठीच्या दुखापतीमुळे ती २०१८ च्या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. २०२२ मध्ये, तिने वेटलिफ्टिंगमध्ये चौथे स्थान पटकावले आणि स्पर्धेदरम्यान तिच्या दुखापत झाली. आता, तिने अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले खाते उघडले आहे.

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

Web Title: Asian games 2026 mirabai chanu silver weightlifting medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Mirabai Chanu
  • Silver Medal
  • weightlifting

संबंधित बातम्या

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल
1

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल

Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव
2

Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव

Asian Games : मराठमोळ्या यशस्विनीची चमकदार कामगिरी; महिला टेबल टेनिस संघाला मिळवून दिले क्वार्टर फायनलचे तिकिट
3

Asian Games : मराठमोळ्या यशस्विनीची चमकदार कामगिरी; महिला टेबल टेनिस संघाला मिळवून दिले क्वार्टर फायनलचे तिकिट

Asian Games : क्वार्टर फायनलमध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला धक्का; ‘या’ संघाकडून मिळाला पराभव
4

Asian Games : क्वार्टर फायनलमध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला धक्का; ‘या’ संघाकडून मिळाला पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.