Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Judo Championship: समृद्धी पार्टेची ज्युदो स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Samruddhi Parte won Silver Medal Inter-Divisional Judo Championship: वाई येथील किसन वीर महाविद्यालयाची बी.एस्सी. भाग १ ची विद्यार्थिनी समृद्धी पार्टे हिने शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकावून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 31, 2026 | 07:15 PM
Samruddhi Parte

Samruddhi Parte

Follow Us
Follow Us:
  • किसन वीर महाविद्यालयाची समृद्धी चमकली
  • आंतरविभागीय ज्युदो स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
  • मदनदादा भोसले यांच्या हस्ते सत्कार
वाई :येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील बी.एस्सी. भाग १ ची विद्यार्थिनी समृद्धी पार्टे हिने शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तिच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या हस्ते समृद्धीचा शाल व गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

WTC Points Table मध्ये टीम इंडियाची बल्ले-बल्ले! वेस्ट इंडिजने बांग्लादेशला दिला धक्का, भारताचा थेट ‘या’ क्रमांकावर कब्जा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील कुस्ती संकुलात नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत समृद्धीने आपल्या कौशल्याच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. तिच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, महाविद्यालयाच्या इतिहासात क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले आहे.या प्रसंगी भैय्यासाहेब जाधवराव, प्रा. नारायण चौधरी, चंद्रकांत इंगवले, प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) अंबादास सकट, सतीश भोसले, प्रशांत डोंगरे आणि जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

बोलताना मदनदादा भोसले म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश संपादन करता येते. आजच्या स्पर्धात्मक युगात मुली शिक्षण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याला वाव द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच समृद्धीचे अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

समृद्धीच्या या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी आणि सर्व संचालक मंडळाने समाधान व्यक्त करत समृद्धीचे विशेष कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे आणि क्रीडा विभागप्रमुख मेजर (डॉ.) समीर पवार यांचे समृद्धीला उत्तम मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाकडून मिळणारे योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यांमुळेच हे यश संपादन करता आले, अशी भावना समृद्धीने यावेळी व्यक्त केली.समृद्धी पार्टे हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि वाई पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

IND vs NZ : शेवटच्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये मोठे बदल? 5 खेळाडूंचा पत्ता कट? ‘या’ नव्या शिलेदारांना संधी

Web Title: Samruddhi parte wins silver medal in judo championship kisanveer college wai pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Silver Medal
  • Sports News
  • Wai News

संबंधित बातम्या

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी
1

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार
2

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…
3

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात
4

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.