Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीचा गेम ओव्हर! सात्विक-चिरागचा धक्कादायक पराभव; थाई जोडीने पहिल्याच फेरीत केलं बाहेर

satwiksairaj rankireddy chirag shetty out from asian games: गतविजेते भारतीय जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 25, 2026 | 06:15 PM
satwiksairaj rankireddy chirag shetty out from asian games

satwiksairaj rankireddy chirag shetty out from asian games

Follow Us
Follow Us:
  • सात्विक-चिरागची पदकाची स्वप्नं भंगली
  • पहिल्याच फेरीत थायलंडकडून धक्का
  • थाई जोडीने २-१ ने सामना खिशात घातला
गतविजेते सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मधील पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडले. पहिल्याच फेरीत त्यांना थायलंडच्या पीराचाई सुकफुन आणि पक्कापॉन तीरतसाकुल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय जोडीला इचिनोमिया सिटी म्युनिसिपल जिम्नॅशियम येथे झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ३६ व्या क्रमांकावर असलेल्या थाई जोडीकडून २१-१२, १९-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे सात्विक आणि चिराग पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. थायलंडच्या पक्कापॉन तीरतसाकुल आणि पीराचाई सुकफुन यांनी भारतीय जोडीला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं

सात्विक आणि चिराग पहिल्याच फेरीतून बाहेर

नुकत्याच पार पडलेल्या चायना मास्टर्स स्पर्धा जिंकल्यानंतर सात्विक आणि चिराग आशियाई क्रीडा स्पर्धेत उतरले होते. एका सेटने पिछाडीवर असताना त्यांनी पुनरागमन करत ७० मिनिटांच्या अंतिम सामन्यात चीनच्या हे जितिंग आणि रेन शियांग्यू यांचा ११-२१, २१-१३ आणि २१-१७ असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत थाई जोडीविरुद्ध सात्विक आणि चिराग यांनी सुरुवातीला पहिला सेट २१-१२ ने जिंकून सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. परंतु, सुकफुन आणि तीरतसकुल यांनी दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीला नमवले.थाई खेळाडूंनी पुढच्या दोन फेऱ्यांमध्ये वर्चस्व गाजवले आणि सामन्याचे चित्रच पालटले. त्यांनी दुसरी फेरी २४ मिनिटांत २१-१९ अशी जिंकली. अंतिम फेरीतही सात्विक आणि चिराग यांना अपयश आले. थाई जोडीने तिसऱ्या गेममध्येही चांगली कामगिरी केली. त्यांनी केवळ १९ मिनिटांत २१-१४ असा सामना जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले.

तनिषा-ध्रुव उपांत्यपूर्व फेरीत

मिश्र दुहेरीमध्ये, तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला यांनी सलग दोन विजय नोंदवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत तनिषा आणि ध्रुव यांनी मालदीवच्या निबाल अहमद आणि अमिनाथ नबीहा अब्दुल रझ्झाक यांचा २१-८, २१-७ असा पराभव केला. यानंतर, त्यांनी मलेशियाच्या शेवॉन जेनी लाई आणि सून हुआत गोह यांच्या जोडीला एका तासाच्या चुरशीच्या सामन्यात २२-२०, २४-२२ असे हरवून अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना चीनच्या यान झे फेंग आणि डोंगपिंग हुआंग यांच्या जोडीशी होईल. यापूर्वी, महिला एकेरीमध्ये उन्नती हुडानेही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिने उत्तर कोरियाच्या मी सॉन्ग यूचा ३० मिनिटांत २१-९, २१-१० असा पराभव केला.

IND A vs AUS A: कुमार कुशाग्रचं शतक, गोलंदाजांचा भेदक मारा; कांगारूंचा माज उतरवला! भारताने १६२ धावांनी उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

Web Title: Asian games 2026 satwiksairaj rankireddy chirag shetty defeated in first round by thailand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Chirag Shetty
  • Satwiksairaj Rankireddy

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं
1

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं

Asian Games 2026: भारतीय शूटर्सचा ‘पदकांवर निशाणा’! ऐश्वर्य-नीरज-रुद्रांक्षची कमाल; ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये भारताला रौप्य
2

Asian Games 2026: भारतीय शूटर्सचा ‘पदकांवर निशाणा’! ऐश्वर्य-नीरज-रुद्रांक्षची कमाल; ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये भारताला रौप्य

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक
3

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक

Asian Games 2026: 2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल, टॅलीमध्ये भारताची मोठी उडी
4

Asian Games 2026: 2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल, टॅलीमध्ये भारताची मोठी उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.