
Asian Games : मराठमोळ्या यशस्विनीची चमकदार कामगिरी; महिला टेबल टेनिस संघाला मिळवून दिले क्वार्टर फायनलचे तिकिट
मराठमोळ्या यशस्विनी घोरपडेच्या दमदार कामगिरीच्या जोरावर(Asian Games) एशियन्स गेम्स 2026 मध्ये भारतीय महिला टेबल टेनिस टिमने मंगळवारी थायलंडचा पराभव करत क्वॉर्टर फायनलमध्ये जागा मिळवली. भारतीय संघाने 2-1 असे पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार पुनरागमन करत थायलंडचा 3-2 असा पराभव केला व क्वॉर्टर फायनल गाठली. येथे भारताचा सामना नॉर्थ कोरियाशी होणार आहे.
यशस्विनी घोरपडेने दोन विजयासह भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले, तर श्रीजा अकुलाने ऑलिम्पियन आणि एशियन गेम्स पदक विजेती सुथासिनी सावेत्ताबुतवर 3-1 (9-11, 11-6, 12-10, 11-8) असा विजय मिळवत संघाचा विजय निश्चित केला. भारताने आतापर्यंत एशियन गेम्स टेबल टेनिसमध्ये तीन कांस्य पदक पटकावली आहेत. पहिले यश जकार्तामध्ये 2018 साली मिळाले होते. येथे भारतीय पुरुष संघाने एशियन गेम्समध्ये देशातील पहिले टेबल टेनिसचे पदक जिंकले होते.
त्यानंतर शरथ कमल आणि मनिका बत्राने मिक्स्ड डबल्समध्ये आणखीन एक कांस्य पदक पटकावलेले, तर हाँगझोऊ 2023 मध्ये सुतिर्था मुखर्जी आणि अयहिका मुखर्जीने महिला डबल्समध्ये कांस्य पदक मिळवण्याचा मान पटकावला होता.
याआधी भारताचा कराटे खेळाडू चेतन भट्टला मंगळवारी कांस्य पदकाच्या सामन्यात चीनी ताइपैच्या चुंग मेंग-यू से सेंशुकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुरुषांच्या 84 किलो वजनी गटात कुमाइटमध्ये पोडियम ही तो फिनिश करू शकला नाही. त्याआधी सेमिफायनलमध्ये भट्ट जॉर्डनच्या मोहम्मद अलजदाफारीकडून त्याचा 8-0 असा पराभूत झाला होता.
या काळात रोहित बेनेडिक्शन, दानुश सुरेश, ऋषभ दास आणि आकाश मणी या भारतीच चौकडीने 3:40:41 सेकंदाची वेळ घेत हीट्समध्ये 16 देशांमध्ये सातवे स्थान प्राप्त केले. अशाप्रकारे त्यांनी पुरुषांच्या 4×100 मीटर मेडल रिले फायनलसाठी पात्रता मिळवली.