Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी

Table Tennis: मुलींच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडेने आपली विजयी मालिका कायम राखत कर्नाटकच्या शर्वी गहलोटचा ६-३, ६-१ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2026 | 06:08 PM
Pune Sports News

Pune Sports News

Follow Us
Follow Us:
  • ईएमएमटीसी१४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस
  • एकेरी आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश
  • मुलांतसुजई पोथुला, सत्या चिंतागुंता अंतिम फेरीत
Table Tennis: ईएमएमटीसीच्या वतीने आयोजित आणि एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली सुरू असलेल्या ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या (Sports) मायरा शेख हिला दुहेरी मुकुटाची संधी आहे. मुलींच्या एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटांच्या अंतिम फेरीत प्रवेश करून तिने ही कामगिरी केली आहे.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये मुलांच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित तेलंगणाच्या सुजई पोथुला याने तेराव्या मानांकित कर्नाटकच्या आदित्य कामतचा टायब्रेकमध्ये ७-६ (८), ६-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या सत्या चिंतागुंता याने सातव्या मानांकित तामिळनाडूच्या जेगन सेंथिलचा ६-१, ६-१ असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

मुलींच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडेने आपली विजयी मालिका कायम राखत कर्नाटकच्या शर्वी गहलोटचा ६-३, ६-१ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसरी मानांकित महाराष्ट्राची मायरा शेख हिने महाराष्ट्राच्याच नवव्या मानांकित रिशिता यादवचा २-६, ७-६ (७), ६-१ असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले.

मुलींच्या दुहेरी गटात महाराष्ट्राच्या रिशिता यादव आणि मायरा शेख या तिसऱ्या मानांकित जोडीने अव्वल मानांकित हरियाणाच्या आराधना तेहलन आणि उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडे या जोडीचा ०-६, ५-७, ११-९ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अन्य उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या शौर्या पाटील आणि अस्मी पित्रे यांनी महाराष्ट्राच्या रायमा चव्हाण व कर्नाटकच्या शर्वी गहलोट यांचा ६-१, ६-२ असा पराभव केला.

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद

टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ. सतीश ठिगळे मेमोरियल पाचव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आरव बापट, शरण्या पटवर्धन, वरदान कोलते, शौनक सानपूरकर, संतोष वाक्राडकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित आरव बापटने अव्वल मानांकित नमन अग्रवालचा १०-१२, ११-८, ११-५, १२-१० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धा कुठे सुरू आहे?

    Ans: राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धा ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे.

  • Que: उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडेने कोणाचा पराभव केला?

    Ans: सिद्धी पांडेने कर्नाटकच्या शर्वी गहलोटचा ६-३, ६-१ असा पराभव केला.

Web Title: Myra shaikh chance to win double game in national table tennis comeptition tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार
1

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…
2

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात
3

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात

Cricket: सुहेल लोखंडेचे आक्रमक अर्धशतक; विन टेंपल क्लबने गाठली थेट PCMC करंडकची सेमीफायनल
4

Cricket: सुहेल लोखंडेचे आक्रमक अर्धशतक; विन टेंपल क्लबने गाठली थेट PCMC करंडकची सेमीफायनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.