
फोटो सौजन्य - Cricket Australia सोशल मिडिया
Australia vs England 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेचे आतापर्यत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या मालिकेच्या झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये अभेद्य आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी अॅडलेड येथे होणार आहे. इंग्लंडने नुकतीच या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आता जाहीर करण्यात आला आहे.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी जिंकल्या आणि आता ते कर्णधार बदलणार आहेत. आता ऑस्ट्रेलियाच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या मालिकेसाठी पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार असेल. तो बऱ्याच काळापासून संघाचे नेतृत्व करत होता, परंतु दुखापतीमुळे त्याला अनेक महिने मुकावे लागले. आता, तो पुनरागमन करत आहे.
अॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी १७ डिसेंबर रोजी अॅडेलेड येथे सुरू होणार आहे. या सामन्यात पॅट कमिन्स पाच महिन्यांनंतर संघात परतले आहेत आणि त्याच्या आगमनाने कांगारूंच्या प्लेइंग इलेव्हनला बळकटी मिळाली आहे. नॅथन लायन देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. अॅडेलेड कसोटीत उस्मान ख्वाजाचा समावेश होण्याची अपेक्षा होती, परंतु त्याची निवड झालेली नाही. ऑस्ट्रेलियन संघ ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदरल्ड या सलामी जोडीसह पुढे जाईल.
अॅडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग ११: ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश इंग्लिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.
Australia have announced their XI for the third Test in Adelaide 👀 Full XI: https://t.co/Yi0w7ANPFv pic.twitter.com/xGN43O904y — cricket.com.au (@cricketcomau) December 16, 2025
इंग्लंडने अॅशेस कसोटी मालिकेत अद्याप आपले खाते उघडलेले नाही, दोन्ही सामने गमावले आहेत. आता, इंग्लंड संघात एक मोठा बदल झाला आहे. गस अॅटकिन्सनला वगळण्यात आले आहे आणि जोश टोंग्यू त्याच्या जागी अंतिम अकरा जणांमध्ये स्थान मिळवेल. इंग्लंड आता सलग दोन पराभवांनंतर ऑस्ट्रेलियाकडून बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंडचे प्लेइंग ११: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), विल जॅक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, जोश टंग.