ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने शतक ठोकून मोठा टप्पा गाठला आहे.
सिडनी कसोटीतील स्टीव्ह स्मिथचे शतक स्वतःमध्ये खूपच खास आहे, कारण त्याने या शतकासह इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जॅक हॉब्सला मागे टाकले आहे. स्मिथचे हे १३ वे अॅशेस शतक आहे.
ऑस्ट्रेलियन संघ अॅशेस मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे आणि त्यामुळेच कांगारूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसऱ्या दिवशी लॅबुशेनची इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सशी भांडण झाले आणि त्यानंतर मैदानावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाचव्या अॅशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे सीम-बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला तेव्हा व्हेटोरीची टिप्पणी आली. ब्रिस्बेन कसोटीत, यजमान संघाने अशाच चार-पायरी वेगवान गोलंदाजांचा वापर केला.
जो रूट ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिकेत एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा चौथा इंग्लिश फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचीही बरोबरी केली आहे. रूट आता या यादीत संयुक्त तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
कसोटी क्रिकेटमधील रूटचे हे ६७ वे अर्धशतक आहे, तर चंद्रपॉलने ६६ अर्धशतके केली होती. आता, या यादीत जो रूटच्या पुढे 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आहे, रूट आणि…
संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये शोकाचे वातावरण सामन्यापूर्वी होते, हल्ल्यात जखमी झालेले काही जण मैदानावर आले आणि संपूर्ण स्टेडियमने त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे स्मरण केले.
पाचवी आणि शेवटची अॅशेस कसोटी मालिका रविवारपासून सिडनी येथे सुरू झाली आहे. बोंडी बीचवरील गोळीबारानंतर, रायफलधारी पोलिस कर्मचारी सिडनीतील पाचव्या कसोटी सामन्यात गस्त घालतील.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. आयसीसीकडून चौथ्या अॅशेस कसोटी सामन्यातील खेळपट्टीला असमाधानकारक दर्जा देण्यात आला.
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर दोन वर्षांनी, उस्मान ख्वाजा देखील क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे वृत्त आहे. ख्वाजा सिडनीमध्ये त्याची शेवटची कसोटी देखील खेळू शकतो असा सोशल मिडियावर अनेक वृतांमध्ये दावा केला जात…
शुभमन गिलच्या भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती, तो भारतीय संघ मजबूत नसल्याचे मत इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कुकने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना इंग्लंडने ४ विकेट्स आपल्या नावे केला. या विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रतिक्रिया दिली असून ती चांगलीच चर्चेत आहे.
अॅशेस मालिकेतील चौथा कसोटीच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावा करण्याचा विक्रम रचला आहे.
WTC पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया वर्चस्व गाजवत आहे. ऑस्ट्रेलियाने सात सामने खेळले आहेत आणि फक्त एक गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग सहा सामने जिंकले आहेत आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळला जात होता. विक्रमी संख्येने प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी गर्दी केली आणि इतिहास रचला.
आजपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. पहिल्याच दिनी दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी 20 विकेट्स घेतले आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ १५२ धावांवर ऑलआउट झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला.
पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळणारा ब्रेंडन डॉगेट आणि गुलाबी चेंडूने खेळलेल्या सामन्यात सहभागी झालेला मायकेल नेसर यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने सर्व-गती गोलंदाजांचा वापर करण्याची निवड केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने या संपूर्ण मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्ट सुट्टीत जास्त मद्यपान करणाऱ्या इंग्लंडच्या पुरुष क्रिकेटपटूंची चौकशी होणार, अशी माहिती इंग्लंड संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी दिली.