फोटो सौजन्य - X (Proteas Men)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्याची प्लेइंग 11 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमधील मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाले आहे मालिकेच्या दुसऱ्या सामना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कक्रम यांनी नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे तर दुसऱ्या सामन्यात आत्ता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा संघाचा कर्णधार टेंबा बावुमा हा दुसऱ्या सामन्यामधून बाहेर झाला आहे. संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनमुळे प्रेनेलन सुब्रायनला संघाबाहेर ठेवण्यात आले. तसेच, संघ कागिसो रबाडाशिवाय आहे. त्यांचा दुसरा सामनाही जिंकण्याचा प्रयत्न आहे.
ODI captain Temba Bavuma has been rested for the second match against Australia.
This decision is part of his workload management, as he recovered from a hamstring strain which he sustained during the WTC Final in June.
Although he experienced no discomfort during the first… pic.twitter.com/BEb2af8LOz
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 22, 2025
दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय कर्णधार टेम्बा बावुमा दुसरा एकदिवसीय सामना खेळत नाहीये. वर्कलोड व्यवस्थापन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जूनमध्ये झालेल्या WTC फायनल दरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास सहन करावा लागला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला कोणतीही समस्या आली नाही, परंतु वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तो तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात परतेल. त्याच्या जागी एडेन मार्कराम आज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद भूषवत आहे.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 –
मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झांपा, जोश हेझलवुड
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11 –
रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडेन मार्कराम (कर्णधार), टोनी डी जोर्झी, मॅथ्यू ब्रीट्झके, ट्रिस्टन स्टब्स, देवाल्ड ब्रेव्हिस, वियान मुल्डर, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी