फोटो सौजन्य – X (ESPNcricinfo)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाची फलंदाजी डगमगली आणि वेस्ट इंडीजच्या संघाने पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाला 286 धावांवर रोखलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतरही, पहिल्या दिवशी गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विंडीज संघाने सामन्यावर मजबूत पकड राखली. तथापि, अॅलेक्स कॅरी आणि ब्यू वेबस्टर यांच्यातील शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने २८६ धावांचा टप्पा गाठला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, वेस्ट इंडिजचे सलामीवीर क्रीजवर फलंदाजीसाठी आले, परंतु खराब प्रकाशामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर सॅम कॉन्स्टास (२५) आणि उस्मान ख्वाजा (१६) यांनी ४७ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली होती, परंतु उपाहारापूर्वी पाहुण्या संघाने लागोपाठ विकेट्स गमावल्या. विंडीजचा गोलंदाज अल्झारी जोसेफने सामन्यात कहर केला आणि एकूण ४ बळी घेतले. त्याने उस्मान ख्वाजाला एलबीडब्ल्यू बाद करून कांगारू संघाला पहिला धक्का दिला.
पुढच्याच षटकात फिलिपच्या चेंडूवर यष्टीरक्षकाने कोन्स्टस अँडरसनला झेलबाद केले. सामन्यात फक्त ३ धावा काढल्यानंतर स्टीव्ह स्मिथ जोसेफचा बळी ठरला. लंचच्या आधी २६ धावा काढल्यानंतर कॅमेरॉन ग्रीन बाद झाला. कांगारू संघाने ११० धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. संघ अडचणीत होता, पण ब्यू वेबस्टर (६०) आणि अॅलेक्स केरी (६३) यांनी ११२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाची धुरा सांभाळली.
Another successful outing for Alzarri in St George’s 🙌🏼
Among all the regional venues at which he’s played, his bowling average in Grenada 🇬🇩 is his best 👊🏽#WIvAUS | #FullAhEnergy pic.twitter.com/zUcKFhne1P
— Windies Cricket (@windiescricket) July 3, 2025
केरी ८१ चेंडूत ६३ धावा काढून बाद झाला, तर ब्यू वेबस्टर ६० धावा काढून बाद झाला. या दोघांशिवाय खालच्या फळीतील फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. पॅट कमिन्सला अल्झारी जोसेफने बाद केले, तर मिचेल स्टार्क (६) सील्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाने झेलबाद केला. १७ चेंडूत ११ धावा काढल्यानंतर नाथनही जोसेफचा बळी ठरला. विंडीज संघाच्या गोलंदाजांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. संघाकडून अल्झारीने ४, जेडेनने २ आणि शमार-अँडरसन-जस्टिनने प्रत्येकी एक बळी घेतला.