फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन ट्रॉफीची चर्चा सध्या जगभरामध्ये सुरु झाली आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या यजमान पदाचा वाद सोशल मीडियावर त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाला. आता चॅम्पियन ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा ही हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. भारतीय संघाचे सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. तर त्यानंतर उर्वरित सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची दुखापत गंभीर असून या संघाच्या घोषणेने त्याबाबतच्या शंका संपल्यासारखे वाटत होते. मात्र, त्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वैद्यकीय अपडेट संघाकडून आलेले नाही. उल्लेखनीय म्हणजे, सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कला ऑस्ट्रेलिया संघातून वगळण्यात आले आहे. या सलामीवीर फलंदाजाने २०२४ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु आतापर्यंत तो या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १७.४० च्या सरासरीने केवळ ८७ धावा केल्या आहेत. त्यामुळेच निवड समितीने त्याला संघातून वगळले आहे. मॅट शॉर्ट आणि ॲरॉन हार्डी यांचा या स्पर्धेसाठी प्रथमच वरिष्ठ संघात समावेश करण्यात आला आहे. नॅथन एलिसचाही वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघात फक्त हे तीन बदल करण्यात आले आहेत.
संघाच्या या निवडीबद्दल मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, ‘हा एक संतुलित आणि अनुभवी संघ आहे, ज्याचे प्रमुख खेळाडू शेवटचा एकदिवसीय विश्वचषक, वेस्ट इंडिज मालिका, गेल्या वर्षीचा ब्रिटन दौरा आणि नुकत्याच झालेल्या पाकिस्तानच्या घरच्या मालिकेत सहभागी झाले आहेत. ‘
AUSTRALIA SQUAD FOR CHAMPIONS TROPHY 2025 🏆
Cummins (C), Carey, Ellis, Hardie, Hazlewood, Head, Inglis, Labuschagne, Marsh, Maxwell, Short, Smith, Starc, Stoinis, Zampa. pic.twitter.com/OPgYBA7qtY
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2025
पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा.
२५ फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.
२८ फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर.
४ मार्च: उपांत्य फेरी १, दुबई.
५ मार्च: उपांत्य फेरी २, लाहोर.
९ मार्च: अंतिम, लाहोर किंवा दुबई.