ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान : जगभरामध्ये T -२० विश्वचषकाचा (T-20 World Cup 2024) थरार सुरु आहे. या विश्वचषकात २० संघानी सहभाग घेतला आहे. यामध्ये काही नवीन संघानी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान (Australia vs Oman) यांच्यामध्ये सामना रंगला होता. न्यूयॉर्कमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडला. ऑस्ट्रेलियन संघाने २०२४ च्या टी२० विश्वचषकात विजयाने सुरुवात केली. ओमानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सलामीच्या सामन्यात कांगारू संघाने 39 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सामना जिंकावला आणि अर्धशतक ठोकले. त्यानंतर असे काही घडले त्याने तुम्हाला सुद्धा हसू आवरता येणार नाही. (फोटो सौजन्य – ICC)
[read_also content=”जसप्रीत बुमराहची पत्नी संजना पुन्हा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस https://www.navarashtra.com/sports/jasprit-bumrah-wife-sanjana-ganesan-pregnant-again-543784.html”]
डेव्हिड वॉर्नरने सामन्यात अर्धशतक ठोकले, मात्र त्याने विकेट गमावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा रस्ता चुकला आणि दुसऱ्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला. आयसीसीने त्याचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ओमानविरुद्ध 56 धावांवर विकेट गमावल्यानंतर डेव्हिड वॉर्नर पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना चुकून तो विरोधी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊ लागला. ओमानच्या ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या चढत असताना त्याला आपल्याकडून मोठी चूक झाल्याचे जाणवले. आपली चूक लक्षात येताच वॉर्नर पुन्हा पायऱ्या उतरला आणि ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाऊ लागला. त्याचवेळी कॅमेरामनने हा क्षण टिपण्यात अजिबात उशीर केला नाही.
ओमानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शानदार कामगिरी करत इतिहास रचला. तो ऑस्ट्रेलियासाठी T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या काळात त्याने वॉर्नरच्या ओरॉन फिंचचा पराभव केला आहे. वॉर्नरच्या नावावर आता 3155 धावा झाल्या आहेत, तर फिंचने टी-20 इंटरनॅशनलमध्ये 3120 धावा केल्या आहेत.