फोटो सौजन्य – X (BBL)
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे, यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यत झालेल्या मालिकेमध्ये त्याचबरोबर झालेल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. शनिवारी 27 जुलै रोजी झालेल्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा तीन विकेट्सने पराभव केला आणि कॅमेरॉन ग्रीन आणि जोश इंगलिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. आता शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया यजमानांना व्हाईटवॉश करण्यासाठी उत्सुक असेल, तर वेस्ट इंडिजला शेवटचा सामना जिंकून आपला सन्मान वाचवण्याची संधी असेल.
वेस्ट इंडिजने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ग्रीनने खेळी खेळली त्याने या सामन्यात नाबाद ३५ चेंडूमध्ये ५५ धावा केल्या होत्या, यामध्ये त्याने तीन षटकार, तीन चौकार मारेल. जोश इंगलिस याने संघासाठी ५१ धावा केल्या,त्याने ५१ धावांची खेळी ३० चेंडूमध्ये पुर्ण केली, यात त्याने १० चौकार, एक षटकार मारले. यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने १९.२ षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात २०६ धावा करून विजय मिळवला. वेस्ट इंडिजकडून जेडिया ब्लेड्सने २९ धावांत तीन विकेट्स घेतल्या.
Fought to the end.
We close out the series on Monday #WIvsAUS | #MenInMaroon pic.twitter.com/7P92G1lm07
— Windies Cricket (@windiescricket) July 27, 2025
वेस्ट इंडिजने यापूर्वी नऊ विकेट गमावून २०५ धावा केल्या होत्या परंतु त्यांच्या संघातील कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. यजमान संघाच्या चार फलंदाजांनी २० धावांचा टप्पा ओलांडला ज्यामध्ये शेरफेन रुदरफोर्डने ३१ धावा करून संघाची सर्वाधिक धावा काढली. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन हार्डी, झेवियर बार्टलेट आणि शॉन अॅबॉट यांनी प्रत्येकी दोन तर अॅडम झम्पाने तीन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर मिचेल मार्श (००) गमावला कारण तो ब्लेड्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर इंग्लिसने सलामीवीर ग्लेन मॅक्सवेल (४७) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ६६ आणि ग्रीन सोबत तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. ग्रीनने एरॉन हार्डी (२३) सोबत सहाव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना अॅडम झम्पाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. यानंतर, ऑस्ट्रेलियाने १९.२ षटकांत ७ गडी गमावून हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. याशिवाय जोश इंगलिसने ५१ धावा केल्या.