Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Australian Open 2026 : एलिस मेर्टेन्स-झांग शुआई यांचा डबल धमाका! डॅनिलिना-क्रुनिक यांना धूळ चारून जिंकले महिला दुहेरीचे विजेतेपद 

एलिस मेर्टेन्स आणि झांग शुआई यांनी ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ मध्ये इतिहास घडवला आहे. या दोन खेळाडूंनी अण्णा डॅनिलिना आणि अलेक्झांड्रा क्रुनिक यांना पराभूत करत महिला दुहेरीचे विजेतेपदावर नाव कोरले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 31, 2026 | 04:31 PM
Australian Open 2026: Elise Mertens and Zhang Shuai create a double sensation! They defeated Danilina and Krunic to win the women's doubles title.

Australian Open 2026: Elise Mertens and Zhang Shuai create a double sensation! They defeated Danilina and Krunic to win the women's doubles title.

Follow Us
Close
Follow Us:

Australian Open 2026, Women’s Mixed Doubles : एलिस मेर्टेन्स आणि झांग शुआई यांनी ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ टेनिस स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिला दुहेरीचे विजेतेपदावर नाव कोरले आहे. अनुभवी बेल्जियम आणि चिनी जोडीने अंतिम फेरीत अण्णा डॅनिलिना आणि अलेक्झांड्रा क्रुनिक यांचा ७-६(४), ६-४ असा दणदणीत पराभव करून जेतेपद जिंकले.

हेही वाचा : IND vs PAK U19 Live Streaming : भारत विरुद्ध पाकिस्तान मेगा मॅचसाठी व्हा सज्ज! जाणून घ्या कधी आणि किती वाजता सुरू होईल सामना?

अंतिम फेरीबद्दल सांगायचे झाले तर, चौथ्या मानांकित मर्टेन्स-झांग जोडीने पहिल्या सेटमध्ये ४-१ च्या पराभवानंतर लक्षणीय पुनरागमन करत  टायब्रेकमध्ये सेट आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये त्यांनी ५-० अशी आघाडी मिळवली. तथापि, सातव्या मानांकित डॅनिलिना-क्रुनिक जोडीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करून ५-२ अशा फरकाने दोन चॅम्पियनशिप पॉइंट वाचवण्यात यश मिळवले. परंतु शेवटी, मर्टेन्स आणि झांगने सामना आपल्या नावे केला.

२०२२ नंतर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र

मर्टेन्स आणि झांग यांनी २०२२ मध्ये विम्बल्डनमध्ये शेवटचा ग्रँड स्लॅम एकत्र खेळला होता. दीर्घ काळानंतर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुन्हा एकत्र आल्याने, या जोडीने उत्कृष्ट समन्वय दाखवत इतिहास रचला आणि जेतेपद जिंकले.

मर्टेन्सचा सहावा ग्रँड स्लॅम विजय

या विजयासह, मर्टेन्सच्या ग्रँड स्लॅम दुहेरी जेतेपदांची संख्या आता सहा झाली आहे, त्यापैकी तीन ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्या गेल्या. झांग शुआईकडे आता तीन ग्रँड स्लॅम दुहेरी ट्रॉफी जमा आहेत. यापूर्वी, झांगने २०१९ ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०२१ यूएस ओपनमध्ये समंथा स्टोसूरसह महिला दुहेरीचे जेतेपद आपल्या नावे केले होते. मर्टेन्सने गेल्या सलग तीन वर्षांत प्रत्येकी एक डबल्स ग्रँड स्लॅम जेतेपद आपल्या नावे केले आहे.

हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I :कर्णधार म्हणून सूर्या रचणार इतिहास! एका षटकारासह घालेल विक्रमाचा धुमाकुळ

होमटाउन वाइल्डकार्ड्स जेसन कुबलर आणि मार्क पोलमन्स पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, मिश्र दुहेरीत, ऑस्ट्रेलियन जोडी ऑलिव्हिया गाडेकी आणि जॉन पीअर्स यांनी सलग दुसरे जेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. गाडेकी आणि पीअर्स यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम मिश्र दुहेरीचे जेतेपद राखणारी ३७ वर्षांत पहिली जोडी ठरली आहे. १९८८-८९ मध्ये जाना नोवोत्ना आणि जिम पग यांच्यानंतर गाडेकी आणि पीअर्स यांनी ही किमया साधली आहे.

Web Title: Australian open 2026 elise mertens and zhang shuai defeated danilina and krunic to win the womens doubles title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Australian Open

संबंधित बातम्या

Australian Open : Jannik Sinner ला हरवून Novak Djokovic ने अंतिम फेरीत केला प्रवेश! जेतेपदाच्या लढतीत अल्काराजशी सामना करणार
1

Australian Open : Jannik Sinner ला हरवून Novak Djokovic ने अंतिम फेरीत केला प्रवेश! जेतेपदाच्या लढतीत अल्काराजशी सामना करणार

Australian Open 2026 : कार्लोस अल्काराझचा झंझावात! झ्वेरेव्हला पराभूत करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत एंट्री 
2

Australian Open 2026 : कार्लोस अल्काराझचा झंझावात! झ्वेरेव्हला पराभूत करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत एंट्री 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.