IND VS BAN: Bangladesh in trouble before the match against India! Captain Liton Das injured; Doubtful about playing...
Asia cup 2025 : बंगालदेश संघाने आशिया कपच्या (Asia cup 2025 ) सुपर ४ सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत विजयी सुरवात केली. या संघाचा आगामी सामना हा बलाढ्य भारताविरुद्ध असणार आहे. या सामन्याआधीच बांगलादेश संघाला मोठा झटका बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. आयसीसी अकादमी मैदानावर सराव करत असताना लिटन दासला पाठीचा त्रास झाला. मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, दास नेट्समध्ये सराव करत असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्नानात असताना त्याला डाव्या पाठीत अस्वस्थता जाणवू लागली. टीम फिजिओ बायझिद उल इस्लाम यांच्याकडून त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याला सराव सत्र अर्ध्यावर सोडावे लागले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याकडून क्रिकबझला सांगण्यात आले की, “मंगळवारी लिटन दासची तपासणी करण्यात येईल. तो बाहेरून ठीक असल्याचे दिसत आहे, परंतु अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे.” या घटनेनंतर बांगलादेशचा कर्णधार लिटन दासला कोणतीही मोठी अस्वस्थता जाणवली नसली तरी, कर्णधार भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात जर त्याला हजर राहता आले नाही तर बांगलादेशसाठी हा मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.
आशिया कप २०२५ मधील सुपर ४ सामना बुधवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा पहिला सुपर फोर सामना ६ विकेट्सने आपल्या नावे केला आहे. तर बांगलादेशने आपला पहिला सुपर ४ च्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले आहे. भारतीय संघ सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे बांगलादेश संघाला भारतापासून सावधान राहावे लागणार आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तानसह श्रीलंकन खेळाडूंच्या रडारवर अभिषेक शर्मा! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा,हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती,संजू सॅमसन, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग.
बांगलादेशचा संघ : लिटन दास (कर्णधार), सैफ हसन, तौहीद ह्रदोय,परवेझ हुसेन इमॉन, झाकेर अली, शमीम हुसेन, नुरुल हसन, मेहिदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, तस्किन मोहम्मद मोहम्मद, शरीफुल मोहम्मद, शरीफउद्दीन, शमीम हसन.