अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan vs Sri Lanka Super 4 match : आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत दोन सुपर ४ चे सामने खेळले गेले आहेत. पहिल्या सुपर ४ सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत केले तर दुसऱ्या सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानल धूळ चारली आहे. यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे खेळाडू भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात पाकिस्तान आणि श्रीलंकेचे खेळाडू आहेत जे या टी-२० आशिया कप २०२५ स्पर्धेत अभिषेक शर्मासारखेच काम करताना दिसत आहेत. आता, जेव्हा काम सारखेच असणार आहे तर यांच्यामध्ये एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा असणार आहे. यामुळेच पाकिस्तानी आणि श्रीलंकेचे खेळाडू अभिषेक शर्माचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, त्यांच्यात कोणते काम समान आहे? तसेच भारताच्या अभिषेक शर्माचा पाठलाग करणारे पाकिस्तान आणि श्रीलंकेचे खेळाडू नेमके आहेत तरी कोण? आशिया कप २०२५ मधील कामाबद्दल सांगायचे झाले तर आपापल्या संघांसाठी सर्वाधिक धावा काढण्याशी जुळलेले आहे. उदाहरणार्थ, अभिषेक शर्मा आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याचप्रमाणे, पाकिस्तानसाठी, साहिबजादा फरहानने सर्वाधिक धावा केल्या आहेत तर श्रीलंकेसाठी पथुम निस्सांकाने ही भूमिका पार पाडलेली आहे.
भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने चार डावांमध्ये २०८ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १७३ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने १२ षटकार लगावले आहेत. या यादीतील दुसरे नाव श्रीलंकेचा पथुम निस्सांकाचे घ्यावे लागते. त्याने चार डावांमध्ये १४८.९७ च्या स्ट्राईक रेटने १४६ धावा काढल्या आहेत. ज्यामध्ये त्याने चार षटकार खेचले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये खेळाडू पाकिस्तानचा साहिबजादा फरहानचे नाव आहे. ज्याने चार डावांमध्ये १०१.५३ च्या स्ट्राईक रेटने १३२ धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याने सहा षटकार ठोकले आहेत.
निस्सांका आणि फरहान अभिषेक शर्माला धावांच्याबाबत मागे टाकण्याची शक्यता आहे. निस्सांका आणि फरहान अभिषेक शर्मापेक्षा धावांच्याबाबत फार जास्त मागे नाहीत. अभिषेक निस्सांकापेक्षा केवळ २७ धावांनी पुढे आहे, तर फरहान ४१ धावांनी पुढे आहे. म्हणजे आगामी सामन्यात हे दोघे मोठ्या खेळी खेळून अभिषेक शर्माला मागे टाकण्याची शक्यता आहे.