Finally, the date for BCCI elections has been set! Elections will be held for 'these' posts..
BCCI election date finally set : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात सकाळी ११:३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेचा महत्त्वाचा अजेंडा निवडणुका घेणे हा असणार आहे. या बैठकीबाबतची सर्व माहिती राज्य संघटनांना पाठवण्यात आली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांच्याकडून पाठवलेल्या पत्रानुसार, या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. तथापि, सैकिया यांनी पाठवलेल्या पत्रात सर्व पदांसाठी निवडणुका घेण्यार येण्यात असल्याबाबत लिहिले आहे.
हेही वाचा : सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची स्थापना आणि इंडियन प्रीमियर लीग आणि महिला प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचा समावेश असणार आहे. सर्वोच्च परिषदेत बोर्डाच्या महासभेतील एक प्रतिनिधी आणि भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे दोन प्रतिनिधी असणार आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट हे आगामी तीन वर्षे किंवा प्रस्तावित क्रीडा विधेयक लागू होईपर्यंत भारतीय क्रिकेट चालवणाऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. जे सध्याच्या संविधानाची जागा घेण्याची शक्यता आहे. क्रीडा विधेयक लागू झाल्यानंतर बीसीसीआयकडून पुनः निवडणुका घेण्यात येणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. परंतु सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशींच्या आधारे मंडळाने संविधानानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : BCCI कडून Shreyas Iyer ला मोठी भेट! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये वाहणार भारताची धुरा..
ऑक्टोबर २०२२ मध्ये, रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांची जागा घेतली होती. सौरव गांगुलीने त्याचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पदावरून पायउतार झाला होता. त्याच वेळी, बिन्नी यांच्याकडून या पदासाठी अर्ज दाखल करण्यात अलया होता. तेव्हा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणारे ते एकमेव उमेदवार होते.
रॉजर बिन्नी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने दोन मोठी विजेतेपदे आपल्या नावे केली होती. पहिले, २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक विजेतेपद आणि नंतर २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.