दिनेश कार्तिक(फोटो-सोशल मीडिया)
Dinesh Karthik’s India All-Time T20 XI : माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिक मैदानावर गदर माजवत होताच तो आता निवृत जरी झाला असला तरी त्याच्या क्रिकेटप्रेमातून तो नेहमी चर्चेत असतो. सध्या तो मैदानात खेळताना दिसत नाही पण मैदानात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याची दिलखेचक अशी कॉमेंट्री करत असतो. त्याचे विश्लेषण हा आजकाल चर्चेचा विषय होत आहे. या ४० वर्षीय स्टार माजी खेळाडूने भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात बळकट प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. ज्यामध्ये त्याने अनेक स्टार खेळाडूंना स्थान दिले आहे. आयपण दिनेश कार्तिकच्या संघाची माहिती जाणून घेऊया.
हेही वाचा : UAE vs AFG : अफगाणिस्तान एक्सप्रेस सुसाट! टी-२० मध्ये घडवला इतिहास; परदेशी भूमीवर केला ‘हा’ एकमेव पराक्रम
दिनेश कार्तिककडून सलामीवीर म्हणून गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या सारख्या महान फलंदाजांना वगळून अभिषेक शर्मा आणि रोहित शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या स्फोटक फलंदाजीबद्दल क्रिकेट विश्व परिचित आहे. तसेच तरुण स्टार अभिषेक शर्माने अलिकडच्या काही काळात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
कार्तिकने मधल्या फळीत अनेक भारतीय दिग्गज खेळाडूंना स्थान दिले आहे. ज्यामध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंग यांना मधल्या फळीत निवडले आहे. कार्तिकने किंग कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर उतरवले आहे. कोहलीकडे कठीण परिस्थितीत डाव सांभाळण्याची उत्तम क्षमता आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाचव्या क्रमांकावर युवराज सिंगची निवड केली आहे.
संघात दोन अष्टपैलू खेळाडू..
कार्तिकने त्याच्या ऑलटाइम प्लेइंग इलेव्हन संघात दोन अष्टपैलू खेळाडूंना निवडले आहे. ज्यामध्ये हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांच्या नावाला पसंती दिली आहे.
हेही वाचा : BCCI कडून Shreyas Iyer ला मोठी भेट! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये वाहणार भारताची धुरा.
दिनेश कार्तिकने त्याच्या संघाची धुरा भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनीकडे सोपवली आहे. ज्याने २००७ मध्ये भारतीय संघाला टी-२० विश्वचषक जिंकून दिला, तसेच कप्तान कुलच्या खांद्यावर कार्तिकने यष्टीरक्षकाची जबाबदारी देखील टाकली आहे.
दिनेश कार्तिकने त्याच्या टी २० संघात दोन वेगवान गोलंदाज आणि एक मुख्य फिरकी गोलंदाज निवडला आहे. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांना वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. तर मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून त्याने वरुण चक्रवर्तीला संघात ठेवले आहे.
अभिषेक शर्मा, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक),हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार.