श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
Shreyas Iyer to captain India A against Australia : आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड न झालेला भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बीसीसीआयकडून मोठी भेट देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध भारत अ संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी भारत अ संघ जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल..
भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामने लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळणार आहे. पहिला सामना १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. दुसरा सामना २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रेयस अय्यर हा बेंगळुरूमध्ये मध्य झोनविरुद्ध दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत खेळणाऱ्या पश्चिम झोन संघाचा भाग आहे. ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.
त्याच वेळी, नारायण जगदीशन, अभिमन्यू ईश्वरन यासारख्या स्थानिक क्रिकेट स्टार खेळाडूंना देखील या संघात स्थान दिले गेले आहे. त्याच वेळी इंग्लंडच्या शेवटच्या कसोटीत स्टार कामगिरी करणारा प्रसिद्ध कृष्णाचाही या संघात समावेश केला गेला आहे. याशिवाय, दुलीप ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुष बदोनील देखील संघात समाविष्ट करण्यात आले आहे. तर जखमी खेळाडू नितीश कुमार रेड्डीला देखील संघात स्थान मिळाले आहे.
बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे की, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांचा दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यासाठी संघात समावेश केला जाणार आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्या सामन्यानंतर संघात समाविष्ट केलेल्या दोन खेळाडूंची जागा घेणार आहेत.
हेही वाचा : UAE vs AFG : अफगाणिस्तान एक्सप्रेस सुसाट! टी-२० मध्ये घडवला इतिहास; परदेशी भूमीवर केला ‘हा’ एकमेव पराक्रम
अनधिकृत कसोटी सामन्यांनंतर तीन एकदिवसीय सामने देखील खेळवण्यात येणार आहेत. यासाठी भारत अ संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी होणार असून दुसरा सामना ३ ऑक्टोबर रोजी आणि तिसरा आणि शेवटचा सामना ५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने कानपूरमध्ये खेळले जाणार आहेत.
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिककल, हर्ष दुबे, आयुष बदोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुश कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.