फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Mithun Manhas is the new BCCI president : भारताचा संघ आज आशिया कप 2025 चा फायनलचा सामना खेळणार आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे, त्याआधी भारतीय नियामक मंडळासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयला नवा बॉस मिळाला आहे. जम्मू क्रिकेट असोसिएशनशी संबंधित माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ते रॉजर बिन्नीची जागा घेतील.
मिथुन मनहास (Mithun Manhas is the new BCCI president) यांची बीसीसीआयच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) चे विद्यमान अध्यक्ष आणि माजी भारतीय फिरकी गोलंदाज रघुराम भट हे कोषाध्यक्ष आहेत. केएससीए अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. देवजीत सैकिया सचिवपदी कायम आहेत, तर प्रभतेज भाटिया यांची संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
A momentous occasion to celebrate!
Mithun Manhas has been officially declared as the new President of the ‘Board of Control for Cricket in India’ #BCCI.
What a providential Sunday for the erstwhile district of Doda, one of the remotest parts of Jammu & Kashmir, which incidentally… pic.twitter.com/I6PpEMtH2T — Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) September 28, 2025
बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन बीसीसीआय अधिकाऱ्यांची नावे अंतिम करण्यात आली. दिल्लीच्या स्थानिक क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिथुन मनहास यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये जन्मलेल्या मिथुनने दिल्लीसाठी सर्वाधिक क्रिकेट सामने खेळले. तो मधल्या फळीतील फलंदाज होता आणि रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीचे नेतृत्व करत होता. मनहासने १५७ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि ९,७०० धावा केल्या. तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), पुणे वॉरियर्स आणि सीएसकेसाठीही खेळला. बीसीसीआयचे अध्यक्ष होणारा तो जम्मू आणि काश्मीरमधील पहिला व्यक्ती असेल.
अध्यक्ष – मिथुन मनहास
उपाध्यक्ष – राजीव शुक्ला
सचिव- देवजीत सैकिया
कोषाध्यक्ष – रघुराम भट्ट
सहसचिव – प्रभतेज भाटिया
आयपीएल अध्यक्ष – अरुण धुमल
मिथुन मनहास हा उजव्या हाताचा फलंदाज आहे जो गरज पडल्यास विकेट घेण्यासाठी आर्म-स्पिन गोलंदाजी करतो. त्याने १९९७-९८ च्या हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १५७ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि ९७१४ धावा केल्या, ज्यात २७ शतके आणि ४९ अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याने १३० लिस्ट ए सामने आणि ९१ टी-२० सामने खेळले. मनहासने भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व केले.
२००७-०८ च्या हंगामात त्याने दिल्लीला रणजी करंडक विजेतेपद मिळवून दिले आणि त्या हंगामात ९२१ धावा केल्या. तो कधीही वरिष्ठ भारतीय राष्ट्रीय संघात खेळला नाही, कारण मधल्या फळीतील स्थानांसाठी तीव्र स्पर्धा होती, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली सारख्या दिग्गजांना संधी मिळाली. आयपीएलमध्ये मिथुन दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि सीएसकेकडून खेळला.