Champions Trophy should not be taken to PoK, ICC has given a sharp decision to Pakistan
राजधानी : क्रिकेट क्षेत्रातील महत्वाची समजली जाणारी २०२५ ची चॅम्पिअन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. यंदा पाकिस्तानमध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. सर्व संघ पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी येणार असल्याचे कळते आहे. मात्र भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार की नाही याबाबत अजून नक्की समजू शकलेले नाही. मात्र याबाबत आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघ स्पर्धेसाठी पाक मध्ये जाणार की नाही याबाबत सचिव जय शाह यांनी भाष्य केले आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला नाही तर ही स्पर्धा हायब्रीड प्रकाराने खेळवली जाऊ शकते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”आम्ही तिकडे खेळायला जायचे की नाही याबाबत अजून आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.” मात्र भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे.
आशिया कपसाठी देखील भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला नव्हता. आशिया कपचे आपले सर्व सामने भारतीय संघ श्रीलंकेत खेळला होता. म्हणजे यावेळेस पण जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला नाही तर, आशिया कपप्रमाणे ही स्पर्धा हायब्रीड प्रकारात खेळवली जाऊ शकते. भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही आमच्यासाठी महत्वाची मालिका असणार असल्याचे सचिव जय शाह म्हणाले आहेत.