Bengaluru Stampede: Siddaramaiah government in crisis! RCB raises big issue in High Court, read in detail..
Bengaluru Stampede : आरसीबीने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव लकरत पहिले विजेतेपद जिंकले आहे. या विजेतेपद जिंकल्यानंतर ४ जून रोजी विजय साजरा करण्यात आला तेव्हा एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता आणि ७५ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर आरसीबी संघासह ४ संघटनांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरसीबीच्या मालक रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेड विरुद्ध फौजदारी गुन्हाही दाखल केला होता. ज्याविरुद्ध आरसीएसएलने आता कर्नाटक उच्च न्यायालयाचे दरवाजे वाजवले आहे.
आरसीएसएलकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे की त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात येत आहे. तसेच याचिकेत असा दावा करण्यात आला होता की सोशल मीडियावर आरसीबीकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आले होते की, ज्यांनी बंगळुरू संघाच्या अधिकृत वेबसाइटवर आधीच नोंदणी केली आहे त्यांनाच मैदानात प्रवेश देण्यात येणार. त्याच वेळी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारी कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कने देखील एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : जसप्रीत बुमराह करणार जागतिक क्रिकेटवर राज्य! दोन विकेट अन् वसीम अक्रमचा विक्रम खालसा..
वृत्तांनुसार, याचिकेत दावा करण्यात आला आहे, की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, डीएनए नेटवर्क्स आणि पोलिसांशी सल्लामसलत केल्यानंतरच विजय परेडची घोषणा करण्यात आली होती. ४ जून रोजी सकाळी आरसीबी संघाला तोंडी सांगण्यात आले होते की, बंगळुरू पोलिसांनी विजय परेड कार्यक्रम रद्द केला आहे. यासोबतच, त्यांना असे देखील सांगण्यात आले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या विधान सौधा येथे बंगळुरू संघाचा सन्मान करण्यासाठी योजना आखत आहेत.
हेही वाचा : SA vs AUS : Travis Head ला WTC फायनलमध्ये रचणार इतिहास : विराट कोहलीचा विक्रम धोक्यात…
आरसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संघाच्या सत्कार समारंभासाठी लोकांना आमंत्रित केले होते. आरसीबीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेले ट्विट पुरावा म्हणून सादर केले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर कार्यक्रम सुरू झाला होता तेव्हाच रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला मैदानाबाहेर चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये लोकांच्या मृत्यूची बातमी मिळाली होती.
राजीनामा देत वेळे अधिकारी म्हणाले की, दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित आणि दुःखद घटनांमध्ये आमची भूमिका खूपच मर्यादित भूमिका असू शकते, परंतु याची आम्ही नैतिक जबाबदारी घेत आमच्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच टे पुढे म्हणाले की, आम्ही ६ जून २०२५ रोजी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून सचिव आणि कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.