वसिम अक्रम आणि जसप्रीत बूमराह(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंडमध्ये २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना झाली आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये सराव सामने खेळत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज अनुभवी खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्यांच्याशिवाय भारतीय संघ एका नव्या दमाच्या खेळाडूंसोबत प्रदेश वारी करत आहे. शुभमन गिलकडे संघाची धुरा सोपविली आहे.
या संघात रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह ही दोन अनुभवी खेळाडू आहेत. या मालिकेत, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विक्रम करण्याची संधी चालून आली आहे. त्याला पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रमला मागे तकणेची संधी आहे. त्यानंतर जागतिक क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहचे राज्य चालू होईल.
पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा आशियातील एकमेव गोलंदाज आहे ज्याने सेना (SENA) देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला यांना सेना देश म्हटले जाते. वसीम अक्रमने या देशांमध्ये एकूण १४६ विकेट्स मिळवल्या आहेत. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराहने सेना देशांमध्ये एकूण १४५ कसोटी विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानुसार, जसप्रीत बुमराहला आपला दबदबा निर्माण करण्यासाठी आणि माजी पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमचा विक्रम मोडण्यासाठी फक्त दोन विकेट्सची गरज आहे. इंग्लंड मालिकेत दोन विकेट्स घेणे ही जसप्रीत बुमराहसाठी काही मोठी गोष्ट नाही. २० जूनपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो वसीम अक्रमचा विक्रम मोडण्याची शक्यता वर्तवण्यातएत आहे.
हेही वाचा : SA vs AUS : Travis Head ला WTC फायनलमध्ये रचणार इतिहास : विराट कोहलीचा विक्रम धोक्यात…
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचे नाव देखील सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आशियाई गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर समाविष्ट आहे. त्याने सेना देशांमध्ये एकूण १४१ विकेट्स मिळवल्या आहेत. यादीत चौथ्या क्रमांकावर आणखी एका भारतीय वेगवान गोलंदाजाचा सामावेश आहे. इशांत शर्माने तेथे एकूण १३० विकेट्स मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. तर, श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर १२५ विकेट्स जमा आहेत.