ट्रॅव्हिस हेड(फोटो-सोशल मीडिया)
SA vs AUS : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. संपूर्ण क्रिकेट जग या सामन्याकडे लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड चर्चेत आला आहे. ट्रॅव्हिस हेड सध्या ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू आहे. त्याने गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या सामन्यांमध्ये आपली दमदार कामगिरी करून दाखवली आहे. अशा परिस्थितीत, तो २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. असे बोलले जाता आहे.
यापूर्वी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळला होता. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियासाठी १६३ धावांची मॅचविनिंग खेळी खेळली होती. आता ऑस्ट्रेलिया २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना रंगणार आहे. अशा परिस्थितीत, ट्रॅव्हिस हेडला विराट कोहलीचा एक खास विक्रम खालसा करण्याची संधी आहे.
ट्रॅव्हिस हेड आयसीसी स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा काढत असतो. आजवर त्याचे रेकॉर्ड असेच राहिले आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपली छाप पडण्यास सज्ज आहे. जर त्याने या सामन्यात १९ धावा केल्या तर त्याच्याकडे WTC मध्ये २०० धावा होणार आहेत.
जर ट्रॅव्हिस हेडने WTC च्या अंतिम सामन्यात १८२ धावांची खेळी केली तर तो ICC स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात ५०० धावा करणारा जगातील एकमेव खेळाडू ठरणार आहे. आतापर्यंत विराट कोहलीचे नाव या यादीत समाविष्ट आहे. विराट कोहलीने ICC च्या अंतिम सामन्यात ४१० धावा केल्या आहेत. म्हणजेच, हेड हा विराट कोहलीचा विक्रम मोडण्यापासून फक्त ९३ धावा दूर आहे.
हेही वाचा : Rinku Singh आणि -Priya Saroj यांच्या साखरपुड्यात जया बच्चनचा संताप? सोशल मीडियावर फोटो व्हायरल..
ट्रॅव्हिस हेड व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विक्रम रचण्याची संधी आहे. जर त्यांनी २०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर ते लागोपाठ दुसऱ्यांदा जेतेपद जिंकणारा जगातील पहिला संघ बनणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघ:
टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन, लुंगी एनगिडी, केशव महाराज, केशव महाराज, सेन.
ऑस्ट्रेलिया संघ :
उस्मान ख्वाजा, मारिनस लाबुशेन, सॅम कॉन्स्टाझा, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मॅट कुह्नेमन.