Fans criticize Jasprit Bumrah's 'workload management'! 'This' star bowler backs 'Yorker King'
Jasprit Bumrah backed by Bhuvneshwar Kumar: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका पार पडली आहे. या मालिकेत भारताने २-२अशी बरोबरी साधली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात खेळू शकला. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यावरून बुमराहवर टीका देखील करण्यात येत आहे. अशातच भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने मात्र बुमराहची पाठराखण केली आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टाॅप 5 मध्ये तीन भारतीय
भुवनेश्वर कुमार याने जसप्रीत बुमराहची बाजू घेत बुमराहच्या भूमिकेचं स्वागत केले आहे. बुमराह इंग्लंडमध्ये केवळ सामने खेळले आहे. मात्र एका खेळाडूला तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं किती अवघड असतं हे लोकांना समजत नसल्याचे भुवनेश्वर कुमारने म्हटले आहे. भुनेश्वर पुढे म्हणाला की, “बुमराहची बॉलिंग एक्शन पाहता त्याला दुखापतिला सामोरे जाणे हे स्वाभाविकच आहे. बुमराह गेल्या अनेक वर्षांपासून सर्व फॉर्मेटमध्ये खेळत असून सातत्याने चांगली कामगिरी करत राहणं खूप अवघड असतं. बुमराहने ५ पैकी ३ सामने खेळण्यावरुन मला काहीही एक आक्षेप नाही. जर निवड समितीला या बद्दल माहिती देखील तो काय करु शकतो आणि त्याने ते समाधानी आहेत, याचा अर्थ असा काढायचा की त्यांनाही विश्वास आहे की बुमराह ३ सामन्यांमध्ये आपली मोठी छाप सोडू शकतो”, असं भुनेश्वरकुमारने म्हटले आहे.
हेही वाचा : IND vs PAK : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा काय आहे विक्रम? टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचीच हवा
भुनेश्वर कुमार पुढे देखील म्हटला की, “एखादा खेळाडू सर्वच्या सर्व ५ सामने न खेळता ३ सामने खेळून आपले सर्वस्व देतो, हे पण खूप मोठी कामगिरी आहे. सातत्याने वेगवेगळ्या क्रिकेट फॉर्मेटमध्ये खेळत राहणं किती अवघड याबाबत लोकांना समजत नाही.”
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातच खेळाला होता. जसप्रीत बुमराह याने या ३ सामन्यांमधील एकूण ५ डावात १४ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने या मालिकेत ११९.४ ओव्हर टाकल्या. तसेच २ वेळा ५ विकेट्स घेण्याची कामगिरीही केली.