(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
रविचंद्रन अश्विन म्हणाले, ‘योग्य वेळी निर्णय घेणे ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. पर्थ कसोटीनंतर, संघाच्या आत आणि संघाबाहेर हलवले जात होतं. त्यावेळी मला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागले तेव्हा मला समजले की माझी वेळ संपली आहे. नव्या खेळाडूंना संधी देण्याची हीच खरी संधी आहे. संघात पुनरागमनाच्या आशेने घिरट्या घालणाऱ्या खेळाडूंपैकी मी नाही. मी माझ्या कारकिर्दीत खूप काही मिळवले आहे आणि आता नवीन चेहऱ्यांसाठी मार्ग सोडणे योग्य होते.
अश्विनने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी असलेले नाते आणि संघातील पक्षपाताच्या बातम्यांबाबतही खुलेपणाने सांगितलं. तो म्हणाला की एक प्रशिक्षक म्हणून गंभीरकडे स्वतःची दृष्टी असू शकते. त्याने संघात आल्यापासून तसे निर्णयही घेतला आहेत. हे वेळोवेळी सगळ्यांनी पाहिलं आहे. तो संघाच्या भविष्यासाठी कठोर निर्णय घेण्यास पात्र आहे. अश्विनने कबूल केले की जर गंभीरला वाटत असेल की त्याचा किंवा विराट-रोहितसारख्या दिग्गजांचा काळ संपला असेल तर मग त्यात काहीही चुकीचे नाही. असं बोलत त्यांनी गंभीर बाबतचा हा मुद्दा स्पष्ट केला.
गौतम गंभीरच्या कार्यशैलीबद्दल अश्विन म्हणाला, ‘गौतमवर कोणाला राग आला असेल तर तो मीच आहे कारण तो जसा टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला तसा माझ्या क्रिकेट कारकीर्दीचा माझा प्रवास संपला. पण या सगळ्यात आपला अहंकार बाजूला ठेवून विचार करायला हवा. संघाचे भविष्य सुरक्षित करणं हे प्रशिक्षकाचं काम असते. त्यांच्या दृष्टीमध्ये माझे भविष्य नसेल आणि ते पूर्णपणे ठीक आहे. भारतात मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे कधी-कधी आपण अजिंक्य आहोत असं वाटतं पण प्रत्यक्षात तसं नसतं. असं म्हणत अश्वीनने आपली भूमिका स्पष्ट केली.






