(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
एमएस धोनी एका पोस्टने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. भारताच्या स्टार खेळाडूने IPL 2026 पूर्वी संकेत दिले आहेत की तो 7 नंबरची जर्सी सोडून 8 नंबरची जर्सी घालणार आहे. नंबर-7 हा फक्त एक आकडा नसून माही आणि चाहत्यांसाठी ती एक भावना आहे. धोनीचा जन्म ७व्या महिन्याच्या ७ तारखेला झाला होता, म्हणूनच त्याचासाठी हा नंबर खूप स्पेशल आहे. त्याने जेव्हा भारतासाठी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून हा नंबर त्यांची शान बनला आहे. म्हणून तो या नंबरची जर्सी घालतो. मग आता
एमएस धोनी IPL च्या पहिल्या आवृत्तीपासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. सीएसकेवर बंदी असताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून फक्त २ हंगाम खेळले. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. असे मानले जाते की आयपीएल 2026 हा त्याचा खेळाडू म्हणून शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. मात्र याआधी धोनीने आपल्या पोस्टने सर्वांना चकित केले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करताना धोनीने लिहिले की, “काही नंबर तुमच्यासोबत राहतात आणि माझ्यासाठी 7 हा नंबर एक होता. पण आज मी तो बदलून 8 करत आहे.” व्हिडिओमध्ये 7 नंबरची जर्सी दिसत आहे, पण कोणीतरी ती खाली उतरवून 8 नंबरची जर्सी तिथे लटकवते. पण एमएस धोनी त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात जर्सी नंबर का बदलत आहे? असा प्रश्न प्रत्येक चाहत्याला पडतो. धोनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “याचे कारण तुम्हाला येत्या काळात कळेल.” तथापि, व्हिडिओमध्ये दिसणारी जर्सी CSK किंवा पिवळ्या रंगाची नाही. ही जर्सी निळ्या रंगाची असून त्यावर तिरंग्याचे पट्टे आहेत.
2023 मध्ये बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीची जर्सी क्रमांक-7 निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक 10 देखील (2017 मध्ये) निवृत्त झाली आहे. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 278 सामने खेळले आणि 242 डावांमध्ये 5439 धावा केल्या, ज्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे.






