गुरुवारी ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात भारताने नेदर्लंडवर ५६ धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या भेदक गोलंदाजी समोर नेदरलँडच्या संघाने गुडघे टेकले. भारताने नेदरलँड संघाला दिलेले १८० धावांचे लक्ष गाठताना नेदरलँड संघ अवघ्या १२३ धावांवर बाद झाला. हा सामना भारतीय संघाने मोठ्या फरकाने जिंकला.
भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने नेदरलँड विरुद्ध टी २० विश्वचषकातील दुसरा सामान जिंकला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज के एल राहुल हे दोघे सलामीफलंदाज सुरुवातीला मैदानात उतरले. मात्र १२ चेंडूत अवघ्या ९ धावा करत के एल राहुल स्वस्तात माघारी परतला. तर कर्णधार रोहित शर्मा ३९ चेंडूत ५३ धावा करून झेल बाद झाला. यानंतर भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने सांभाळली. विराट कोहलीने अर्धशतक झळकावत नाबाद ६२ धाव केल्या. सूर्यकुमार यादव याने २५ चेंडूत ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट आणि सूर्याने तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत नाबाद ९५ धावांची भागीदारी रचली आणि नेदरलँड समोर २० षटकात १८० धावांचे आव्हान ठेवले.
नेदरलँड संघ फलंदाजी साठी मैदानात उतरताच भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीची कौशल्य दाखवून दिले. भारतीय गोलंदाज अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार , अर्शदीप सिंग , रविचंद्रन अश्विन , मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत नेदरलँड संघातील फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक काळ टिकू दिले नाही.