कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचा बॉक्सर अमित पंघालनं (Amit Panghal) पहिल्याच सामन्यात वनुआटूच्या नामारी बेरीचा (Namari Berry) पराभव केला. त्यामुळे अमित पंघालनं बॉक्सिंगच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला आहे. (CWG 2022) या सामन्यामध्ये अमित पंघालनं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. पहिल्या दोन फेरीमध्ये नामरी बेरीवर दबाव निर्माण करत मोठ्या शिताफिनं अमितनं नामरी बेरीला पराभूत केलं.
Star Boxer Amit Panghal advances to QF (51kg) with unanimous decision verdict win (5:0) over Namri Berri (VAN) in 1st round.
? Amit is now just one win away from a medal. QF bout on Thursday. #CWG2022 #CWG2022India pic.twitter.com/Y7OJF2d2Z3 — India_AllSports (@India_AllSports) August 1, 2022
अमितनं सामन्याची शानदार सुरुवात केली आणि तीन फेऱ्यांमध्ये १०-१० गुण मिळवले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अमितविरुद्ध नामरी बेरीला संघर्ष करावा लागला. मात्र अमितनं त्याला सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिली नाही. बेरीनं पहिल्या फेरीत ९ गुण मिळवले होते. पण पुढच्या दोन फेरीत तो ८ गुणांच्या पुढे जाऊ शकला नाही.
[read_also content=”कॉमनवेल्थ स्पर्धेत बॉक्सर निकहत झरीनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश https://www.navarashtra.com/sports/nikhat-zareen-entered-in-quarters-round-of-boxing-in-commonwealth-games-2022-nrsr-310423/”]
दुसरीकडे भारताची बॉक्सर निकहत झरीननं (Nikhat Zareen) महिला लाइटवेट ५० किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र शिव थापाला (Shiva Thapa) ६३.५ किलो वजनी गटात आणि सुमित कुंडूला (Sumit Kundu) ७५ किलो वजनी गटात राऊंड १६ मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.






