ICICI Credit Card Rules Change 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ICICI Credit Card Rules Change 2026: जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर येत्या काळात तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आणि सोयीमध्ये बदल करावा लागू शकतो. ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बरेच बदल केलेत. कार्ड बदलायला जास्त पैसे लागणार आहेत, काही कार्डांवर मिळणारा फ्री विमा बंद होणार आहे, आणि बऱ्याच लोकांना आता फ्री मूव्हीची तिकिटं पण मिळणार नाहीत.
हे बदल नोव्हेंबर आणि डिसेंबर 2026 मध्ये वेगवेगळ्या तारखांना लागू होतील. पण एक चांगली गोष्ट म्हणजे हे नियम सगळ्याच कार्डांना लागू होणार नाहीत. कोणत्या कार्डवर कोणता फायदा बंद होणार आहे आणि कुठे जास्त पैसे लागणार आहेत, ते नीट समजून घ्या.
आयसीआयसीआय बँकेने क्रेडिट कार्ड बदलण्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.आता कार्ड हरवलं, तुटलं, खराब झालं, तर नवीन कार्ड काढायला जास्त पैसे मोजावे लागतील. आत्ता कार्ड बदलायला 200 रुपये + GST लागत होता. पण 11 डिसेंबर 2026 पासून हा खर्च 300 रुपये + GST होणार आहे. सरळ 100 रुपये वाढले. जवळपास 50 टक्के वाढ आहे. 100 रुपये वाटत असले तरी दरवेळी कार्ड हरवलं तर 300 + GST द्यावा लागेल, हे लक्षात ठेवा.
Gokul Milk Price Hike: अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार; दरात २ रुपयांची वाढ होणार?
पण यातून 3 कार्डांना सूट दिलीय. एमराल्ड प्रायव्हेट मेटल, 1838 रिझर्व्ह आणि टाइम्स ब्लॅक या कार्डांना हा नवीन नियम लागू होणार नाही. त्यांचं कार्ड बदलायचं शुल्क जुनंच राहील. मोफत विमा आता मिळणार नाही का?जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डसोबत मिळणाऱ्या मोफत विम्याचा लाभ घेत असाल, तर तो आता बंद केला जात आहे. बऱ्याच जणांना माहिती पण नसतं, क्रेडिट कार्डवर फ्री विमा मिळतो. विमान अपघात झाला तर विमा मिळायचा. तो आता बंद होतोय. बँक 15 डिसेंबर 2026 पासून काही कार्डांवर दिला जाणारा फ्री विमा बंद करणार आहे.
एमराल्ड प्रायव्हेट मेटल, टाइम्स ब्लॅक, एमराल्ड, एमराल्ड प्रायव्हेट, डायमंट, सफिरो आणि रूबिक्स. या कार्डांवर आता विमान अपघाताचा विमा मिळणार नाही.याशिवाय ‘कोणत्याही कारणास्तव रद्द करण्याची सुविधा’ पण बंद होणार आहे. म्हणजे तुम्ही फ्लाईट किंवा हॉटेल बुक केलं आणि कोणत्याही कारणाने कॅन्सल केलं, तर पैसे परत मिळायचे. ही सुविधा एमराल्ड प्रायव्हेट मेटल, टाइम्स ब्लॅक, एमराल्ड आणि एमराल्ड प्रायव्हेट कार्डांवर होती. ती पण 15 डिसेंबरपासून बंद.त्याचप्रमाणे, पराक्रम आणि पराक्रम सिलेक्ट कार्ड वापरणाऱ्यांना मिळणारा वैयक्तिक आणि विमान अपघात विमा पण 15 डिसेंबरपासून बंद होणार आहे.
Inflation: ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 6% टक्क्यांच्या पार, सामन्यांच्या तोंडाला फेस
चित्रपटप्रेमी क्रेडिट कार्ड ग्राहकांनाही धक्का बसू शकतो.मूव्ही बघायला आवडणाऱ्यांना तर मोठाच झटका आहे. ICICI बँक 15 डिसेंबर 2026 पासून काही कार्डांवरची मोफत INOX मूव्ही तिकिटांची सोय बंद करणार आहे.
Rubyx, Coral, Expressions, Chennai Super Kings, MakeMyTrip Platinum, MakeMyTrip Signature, MakeMyTrip, HPCL Super Saver आणि Emirates Rubyx. ही कार्डं वापरून आतापर्यंत लोकांना फ्री तिकीट मिळायचं. आता 15 डिसेंबरनंतर त्यांना स्वतःच्या पैशाने तिकीट घ्यावं लागेल.म्हणजे महिन्यातून एकदा फ्री मूव्ही बघायची सवय असेल तर ती आता बंद. आता तिकीटाचे पूर्ण पैसे मोजावे लागतील.
आयसीआयसीआय बँकेने काही बिझनेस आणि कॉर्पोरेट क्रेडिट कार्डांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी संबंधित शुल्कातही बदल केला आहे.बिझनेस कार्ड वापरणाऱ्यांना पण फटका बसणार आहे. 25 नोव्हेंबर 2026 पासून, काही कार्डांवरचं डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (DCC) शुल्क 1 टक्क्यावरून 3.50 टक्क्यांपर्यंत वाढवलं जाईल.
तुम्ही परदेशात गेलात आणि तिथे रुपयांमध्ये पेमेंट केलं, तर त्यावर हे शुल्क लागतं. आधी 1 टक्का लागायचा, आता 3.50 टक्के लागेल. म्हणजे परदेशात 1 लाख खर्च केला तर आधी 1 हजार शुल्क लागायचं, आता 3500 रुपये लागतील.
हा बदल बिझनेस ब्लॅक ॲडव्हान्टेज, बिझनेस ब्लू ॲडव्हान्टेज, ट्रॅव्हल एजंट कार्ड, बिझनेस प्लॅटिनम कार्डांसाठी आहे.थोडक्यात, ICICI चं कार्ड असेल तर तुमचं कार्ड या लिस्टमध्ये आहे का, ते एकदा नक्की तपासा. 15 डिसेंबरच्या आधी असलेले फ्री फायदे वापरून घ्या. आणि कार्ड सांभाळून ठेवा, नाहीतर 11 डिसेंबरनंतर नवीन कार्डला 300 रुपये + GST द्यावा लागेल.
Ans: नवीन नियम २५ नोव्हेंबर, ११ डिसेंबर आणि १५ डिसेंबर २०२६ अशा वेगवेगळ्या तारखांना लागू होणार आहेत.
Ans: ११ डिसेंबर २०२६ पासून कार्ड बदलण्यासाठी ३०० रुपये + GST शुल्क आकारले जाणार आहे.
Ans: Emerald, Sapphiro, Rubyx, Diamond, Times Black आणि इतर निवडक कार्डांवरील विमान अपघात विमा बंद होणार आहे.






