फोटो सौजन्य - ICC
T20 विश्वचषक २०२४ मध्ये (T20 world cup 2024) भारताच्या विजयानंतर सर्व खेळांडूचा आनंद अनावर झाला होता. विजयनांतर आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीसाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. भारताच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि त्यांचा मुलगा अंगद देखील मैदानावर उपस्थित होते.
जसप्रीत बुमराहनं संघातील खेळाडूंची भेट घेतल्यानंतर पत्नी संजनाला मिठी मारली. या क्षणाचे काही व्हिडीओ ICC ने त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये बुमराह त्याच्या पत्नी आणि मुलासोबत आनंद साजरा करताना दिसत आहे. ICC ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बुमराह त्याचा मुलगा अंगदला घेऊन लोकांना अभिवादन करताना दिसत आहे.
हा सामना संपल्यानंतर बुमराहनं संजनाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बुमराहने सांगितलं की, अंगद इथं आहे आणि त्याने त्याच्या वडिलांना वर्ल्ड कप जिंकताना पाहणं हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आम्ही पॅनिक झालो नाही, पण आता विजयाचं वर्णन करायला शब्द कमी पडत आहेत. शांत होत खेळण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा इथं आहे, कुटुंब इथं आहे. आम्ही विजयासाठी खूप मेहनतं केली आहे. यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. अनेकदा मी भावना जाहीर करत नाही. मात्र, आज माझ्याकडे शब्द नाहीत. मी मॅचनंतर रडत नाही पण आज भावना अनावर झाल्या.
भारतानं आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करताच सर्व खेळाडूंनी जल्लोष केला. जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपच्या 8 मॅचेसध्ये 15 विकेट घेतल्या. यामुळं त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार देऊन बुमराहचा गौरव करण्यात आला. बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करत रिझा हॅड्रीक्सला त्रिफळाचित केले. कालच्या सामन्यात बुमराहनेन महत्त्वाची मार्को जान्सनला क्लिन बोल्ड केले. यानंतर मॅच फिरली. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगनं दमदार गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 30 धावा करायच्या होत्या. पण, भारताच्या आक्रमक गोलंदाजीमुळं आफ्रिकेचे प्रयत्न अपुरे राहिले.