पाकिस्तानमध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार का?
पाकिस्तानच्या नवनिर्मित व्हाईट चेंडू क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानला आशा आहे की भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानचा दौरा करेल. फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत अनिश्चितता आहे. राजकीय कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. भारत आणि पाकिस्तानचे संघ गेल्या काही वर्षांपासून आशियाई किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांशी भिडत आहेत. पण तेही तटस्थ ठिकाणी, त्यामुळे ही मॅच पाकिस्तानात असावी अशी आशा रिझवानने दर्शवली आहे.
2008 पासून भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. मात्र, यादरम्यान पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर नक्कीच आला आहे. गेल्या वर्षी, पाकिस्तान संघ 2024 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता, तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रिझवानची अनेक भारतीय खेळाडूंशी मैत्री आहे. भारतात मिळालेले प्रेम तो विसरत नाही. मागच्या वेळी जेव्हा पाकिस्तानचा संघ भारतात आला होता तेव्हा त्यांना हैदराबादी बिर्याणी खूप भावली होती. याशिवाय पाकिस्तान संघ भारतातील पाहुणचाराने खूश होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
‘भारतीय क्रिकेटपटू पाहून पाकिस्तानी उत्साही होतील’
द न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, मोहम्मद रिझवान म्हणाला, ‘पाकिस्तानचे चाहते भारतीय क्रिकेट खेळाडूंवर खूप प्रेम करतात. भारताला पाकिस्तानात पाहून त्यांना आनंद होईल. जर भारतीय संघ आमच्या ठिकाणी आला तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू, भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही याचा निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे. BCCI नेहमीच भारत सरकारच्या पाकिस्तान दौऱ्याच्या निर्णयाची वाट पाहत असते. भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली तर भारतीय संघ तिथे जाईल.
16 वर्षात भारतीय संघ पाकिस्तानात नाही
गेल्या 16 वर्षांत एकदाही असे घडलेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीला जवळपास 4 महिने बाकी आहेत. भारतीय संघ पाकिस्तानशी न खेळण्याची शक्यता आहे. भारताने आशिया चषक 2023 खेळला म्हणून ते हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळण्यास प्राधान्य देईल. मात्र, भारताला पाकिस्तानमध्ये राहायचे नसेल, तर सामना खेळल्यानंतर ते लाहोरमार्गे चंदीगड किंवा दिल्लीत राहू शकतात, असा सल्ला पाकिस्तानने दिला आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान
भारत विरूद्ध पाकिस्तान ही मॅच कुठेही खेळली गेली तर चाहत्यांसाठी पर्वणी असते. मात्र भारत आणि पाकिस्तानचे संबंध पाहता गेल्या 16 वर्षात भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला गेलेला नाही. मात्र पाकिस्तानच्या संघाने भारत दौरा केला आहे. त्यामुळे आता भारतानेही पाकिस्तान यावे आणि आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू असे मोहम्मद रिझवानने म्हटलं आहे. तर आता यावर बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान चाहत्यांमध्ये या खेळासाठी आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
हेदेखील वाचा – IND vs NZ : वानखेडेमध्ये स्पिनर्सला होणार मदत? वाचा मुंबईच्या खेळपट्टीचा अहवाल