Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan च्या पंतप्रधानांना नेमका कोणी केला फोन? India सोबत T20 वर्ल्डकप मॅच खेळायला झटक्यात झाले तयार

भारत–पाकिस्तान T20 वर्ल्डकप सामन्याभोवती मोठा राजनैतिक आणि क्रीडा वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला पाकिस्तानने बहिष्काराचा इशारा दिला होता, मात्र श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या मध्यस्तीनंतर हा सामना खेळला गेला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 18, 2026 | 03:33 PM
Sri Lankan President Anuar Kumara Dissanayake Called Prime Minister Shahbaz Sharif:

Sri Lankan President Anuar Kumara Dissanayake Called Prime Minister Shahbaz Sharif:

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतासोबतच्या मॅचवर बहिष्कार टाकण्याची पाकिस्तानची धमकी
  • पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कोणाचा आला फोन?
  • भारत-पाकिस्तान मॅच होण्यामागे हे ठरले ‘रिअल हिरो’
India Vs Pakistan Match : किक्रेट विश्वातील सर्वात बहुचर्चित असलेला भारत आणि पाकिस्तानचा सामना नेहमी चर्चेत असतो. ICC T-20 WORLDCUP 2026 मध्येही भारत आणि पाकिस्तान सुरुवातीपासूनच चर्चेत होता. या सामन्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे(PCB) चे चेअरमन मोहसिन नकवीदेखील ही मॅच पाहण्यासाठी कोलंबोमध्ये उपस्थित होते. भारताची पाकिस्तानसोबतची मॅच मोठ्या ड्राम्यानंतर झाली. सुरुवातीला पाकिस्तानने भारतासोबतच्या मॅचवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. पण नंतर पाकिस्तानने आपला हा निर्णय बदलला. हा वाद १ फेब्रुवारीला सुरु झाला आणि ९ फेब्रुवारीला संपला. पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या क्रिकेट संघाला भारताविरुद्ध मॅच खेळण्याची परवानगी दिली.

‘ती’ एक मॅच अन् हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, स्टार ऑलराउंडरने सांगितली करिअरच्या टर्निंग पॉइंटची स्टोरी!

पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कोणाचा आला फोन?

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पाकिस्तानला मनवण्यासाठी मोहसिन नकवी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना ‘रिअल हिरो’ म्हटलं आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुअर कुमार दिसानायके यांना भेटून नकवी यांनी सांगितलं की, “सर्वात अगोदर पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून तुमचं अभिनंदन. भारत – पाकिस्तान मॅचचे तुम्ही खरे हिरो आहात. कारण तुमच्यामुळेच २ अरब प्रेक्षकांचं मनोरंजन झालं आणि तुमच्यामुळेच आम्ही ही मॅच खेळलो”.

नकवी यांनी पुढे सांगितलं की, “आमच्याकडे भारताविरुद्ध न खेळण्याची बरीच कारणं होती. पण जसा तुमचा पंतप्रधानांना कॉल आला त्यानंतर त्यांनी मला फोन करुन या मॅचसाठी परवानगी दिली. या मुद्द्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे”.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कॉल

श्रीलंकेचे अध्यक्ष अनुअर कुमार दिसानायके यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना कॉल केला. त्यानंतर पाकिस्तान सरकारने एका निवेदनात सांगितलं की, “श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना सध्या सुरु असलेल्या गोष्टी सोडवण्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली. त्यांनी या संभाषणादरम्यान आठवणही करुन दिली की कठीण काळात पाकिस्तान आणि श्रीलंका एकमेकांसोबत नेहमी उभे राहिले आहेत”.

भारतीय संघ ठरला पाकिस्तानवर भारी

भारत-पाकिस्तान मॅचवरुन झालेल्या ड्राम्यानंतरICC T-20 WORLDCUP 2026 सामन्यात भारतीय संघाने आणखी एकदा पाकिस्तानी खेळाडूंना नेस्तानाभूत केलं. भारतीय संघाने सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानंतर भारताचा सलामी फलंदाज ईशान किशनने खेळी सांभाळली. पाकिस्तान संघाने पहिल्या तीन ओव्हरमध्ये तीन विकेट गमावले.  पुढे पाकिस्तानच्या संघाला खेळ सांभाळता आला नाही. भारतीय संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला.

मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

Web Title: Sri lankan president anuar kumara dissanayake called pm shahbaz sharif to discuss pakistan playing against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • Bangaldesh
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

‘ती’ एक मॅच अन् हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, स्टार ऑलराउंडरने सांगितली करिअरच्या टर्निंग पॉइंटची स्टोरी!
1

‘ती’ एक मॅच अन् हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, स्टार ऑलराउंडरने सांगितली करिअरच्या टर्निंग पॉइंटची स्टोरी!

IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral
2

IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

IND vs PAK : संघातून काढू टाका…सामना गमावल्यानंतर Shahid Afridi संतापला! टीममधून काढून टाकण्याची केली मागणी
3

IND vs PAK : संघातून काढू टाका…सामना गमावल्यानंतर Shahid Afridi संतापला! टीममधून काढून टाकण्याची केली मागणी

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?
4

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.