फोटो सौजन्य - IndianPremierLeague
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders match report : चेपॉक मैदानावर चेन्नईच्या फलंदाजांनी संघाला लाज आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसके संघाला २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १०३ धावा करता आल्या. या धावा कोलकाता संघाच्या ३ फलंदाजांनी पूर्ण केल्या आणि सीझनचा तिसरा विजय नावावर केला आहे तर चेन्नई सुपर किंग्सचा हा सलग सीझनमधील पाचवा पराभव आहे.
कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर क्विंटन डी क्वाकने संघासाठी १६ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ षटकार मारल्या. सुनील नारायणने येताच संघासाठी धुव्वादार फलंदाजी केली आणि संघासाठी महत्वाच्या धावा केल्या. सुनील नारायणने संघासाठी १८ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या यामध्ये त्याने ५ षटकार आणि १ चौकार मारला. कर्णधार अजिंक्य रहाणेने १७ चेंडूंमध्ये २० धावा केल्या तर रिंकू सिंहने संघासाठी १२ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या आणि नाबाद राहिला.
Match 25. Kolkata Knight Riders Won by 8 Wicket(s) https://t.co/gPLIYGimQn #CSKvKKR #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2025
चेन्नई सुपर किंग्जचा चेपॉकवरील हा आतापर्यंतचा सर्वात कमी धावसंख्या आहे. सीएसकेच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नाही. रवींद्र जडेजा आणि दीपक हुडा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्याच वेळी, ६८३ दिवसांनंतर कर्णधारपदी आलेला धोनी फक्त एक धाव काढल्यानंतर बाद झाला. चेन्नई सुपर किंग्ज संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर खूप लाजिरवाणे पराभव पत्करावा लागला आहे. केकेआर विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, पाच वेळा चॅम्पियन सीएसकेला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १०३ धावा करता आल्या.
आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा त्यांच्या घरच्या मैदानावरचा हा सर्वात कमी धावसंख्या आहे. रचिन रवींद्र पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि फक्त ४ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, डेव्हॉन कॉनवेने फक्त १२ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना राहुल त्रिपाठीने २२ चेंडूंमध्ये फक्त १६ धावा करू शकला. विजय शंकरने २१ चेंडूत २९ धावा केल्या पण तो चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. शेवटच्या षटकांमध्ये, शिवम दुबेने काही शक्तिशाली फटके मारले आणि २९ चेंडूत ३१ धावा केल्या.
या विजयासह कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने पॉईंट टेबलवर मोठी उडी मारली आहे आणि नंबर ३ वर उडी मारली आहे तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ नवव्या स्थानावर आहे.