Chinnaswamy Stadium Stampede: RCB faces one-year ban! BCCI's 'that' rule created a stir..
Chinnaswamy Stadium Stampede : १७ वर्षांनंतर आरसीबी संघाने पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबी चाहत्यांचा उत्साह वाढला होता, त्यानंतर त्यांनी देशभर जल्लोष केला. आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या दोन अधिकाऱ्यांनीही राजीनामा देखील दिला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. या सगळ्यात आता आरसीबी संघ चांगलाचा अडकला आहे. या प्रकरणानंतर, बीसीसीआय आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीच्या सहभागाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या विचारात असू शकते.
आरसीबीच्या विजय परेडमध्ये इतक्या मोठ्या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे हे शोधण्यासाठी सध्या चौकशी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, आता बीसीसीआयसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, जर या चुकीत आरसीबी संघ व्यवस्थापनाचे नाव आले तर ते पुढे नेमका काय निर्णय घ्यावा.
आयपीएलमधील सर्व फ्रँचायझी या व्यावसायिक संस्था म्हणून काम करतात, परंतु त्यांचा सहभाग बीसीसीआयच्या कराराद्वारे नियंत्रित करण्यात येतो आणि त्या करारांमध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अनेक कलमे देखील समाविष्ट असतात. या नियमांच्या आधारे आरसीबीविरुद्ध कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
जर आरसीबी व्यवस्थापनाला चौकशीत या गंभीर निष्काळजीपणासाठी थेट जबाबदार धरण्यात आले, तर बीसीसीआयला न्याय मिळवण्यासाठी आणि लीगची विश्वासार्हता राखण्यासाठी बंगळुरूविरुद्ध मोठी कारवाई करावी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ‘…आणि तेव्हा वडील खूप निराश होते’; Rohit Sharma ने सांगितली ‘त्या’ खेळीनंतरची घरातील परिस्थिती
राजीनामा देत वेळे अधिकारी म्हणाले की, दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित आणि दुःखद घटनांमध्ये आमची भूमिका खूपच मर्यादित भूमिका असू शकते, परंतु याची आम्ही नैतिक जबाबदारी घेत आमच्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच टे पुढे म्हणाले की, आम्ही ६ जून २०२५ रोजी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून सचिव आणि कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
पीटीआयचा अहवाल आल्यानंतर काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला. त्या अहवालात असे सांगण्यात आले होते की केएससीएने आरसीबीच्या आयपीएल विजयी उत्सव आयोजित करण्यासाठी विधान सौधा येथे परवानगी मागण्यात आली होती. यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, केएससीएनेच फ्रँचायझीला कार्यक्रमासाठी मान्यता मिळवून देण्यास मदत केली होती. केएससीएने असे देखील म्हटले होते की, कार्यक्रमाची जबाबदारी संबंधित कार्यक्रम कंपनीची असणार आहे, जी सर्व आवश्यक व्यवस्था करेल. त्यानंतर रघुराम भट, शंकर आणि जयराम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला तेव्हा त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की गेट आणि गर्दी व्यवस्थापन ही असोसिएशनची जबाबदारी नाही.