रोहित शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
Rohit Sharma : रोहित शर्माने काही एका महिन्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याआधी त्याने टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. रोहित शर्मा सद्या चर्चेत आला आहे. टीम इंडियाचा माजी कसोटी आणि टी-२० कर्णधार रोहित शर्मा म्हणाला आहे की, आज तो जे काही आहे, त्यात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. यासोबतच, रोहितने नुकत्याच कसोटी स्वरूपातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल देखील खुलासा केला आही. भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या पत्नीच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी रोहित बोलत होता.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्मा म्हणाला की, ‘माझ्या जन्मापासून आतापर्यंत माझ्या पालकांनी मला प्रचंड मदत केली असून नेहमीच पाठिंबा दिला आहे. मला माहित आहे की त्यांनी माझ्या आणि माझ्या भावाच्या गरजा भागवण्यासाठी किती त्याग केला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत याबद्दल विचार करता, तेव्हा तुमच्या पालकांनी जे काही अनुभवले त्याची तुम्हाला खरोखरच कदर वाटू लागते. आणि त्यांनी आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप सारा त्याग केला आहे.’
रोहितने पुढे म्हणाला की, ‘ते एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करायचे आणि त्यांनी खूप त्याग केला जेणेकरून आम्ही आमचे आयुष्य जगू शकू. माझे वडील पहिल्या दिवसापासूनच कसोटी क्रिकेटचे खूप मोठे चाहते राहिले आहेत आणि त्यांना टी-२० क्रिकेट आवडत नाही.’
हेही वाचा : T20 Mumbai League : मुंबई फाल्कन्सचा ट्रायम्फ नाईट्सवर विजय; श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादववर पडला भारी..
टीम इंडियाचा रोहित शर्मा म्हणाला, ‘मला अजून देखील तो दिवस आठवतो जेव्हा मी एकदिवसीय सामन्यात २६४ धावा केल्या होत्या. त्यांची प्रतिक्रिया अशी होती, ‘छान खेळलो, शाब्बास.’ इतकंच ते बोलले. हा एक विश्वविक्रम आहे याबद्दल त्यांच्यामनात कोणताही उत्साह दिसला नाही. पण जरी मी कसोटी क्रिकेटमध्ये ३०, ४० धावा चांगल्या केल्या तरी ते माझ्याशी सविस्तरपणे बोलत असत. त्यांना कसोटी क्रिकेटची खूप आवड होती.’ माजी कर्णधार म्हणाला, ‘त्यांनी मला पुढे जाताना पाहिले आहे. तू ज्युनियर क्रिकेट खेळ. नंतर अंडर-१९, रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि इंडिया अ साठी खेळ आणि मी हे सर्व क्रिकेट खेळलो आहे आणि वडील माझ्या संपूर्ण क्रिकेट प्रवासाचे साक्षीदार राहिले आहेत.’ असे रोहितने सांगितले आहे.