रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma Video viral : भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ ब्रिटीश भूमीवर पोहोचला आहे. २० जूनल पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात होणार आहे. भारतीय संघ शुक्रवारी मुंबईहून ब्रिटनला रवाना झाला आहे. अशातच भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्याबाबत काही खुलासे समोर आले आहेत.
भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे बऱ्याच काळ सोबत कसोटी क्रिकेट खेळले आहेत. रोहित शर्माने जेव्हा कसोटी कारकिर्द सुरू केली तेव्हा तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाथी यायचा. जेव्हा हे दोन्ही खेळाडू मैदानावर उपस्थित असत तेव्हा ते धावांसाठी किंवा विकेटसाठी नाही तर कोण कुठे क्षेत्ररक्षणासाठी उभे रहाणार यावरून वाद करत असत.
टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजाराच्या ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी काही खुलासे केले आहेत. यादरम्यान रोहित शर्मा हसून म्हणाला की, “आपण आपापसात भांडायचो की शॉर्ट लेगवर कोण खेळेल, सिली पॉइंटवर कोण उभे राहील? आणि पुज्जी (पुजारा) नेहमी म्हणायचा की मी तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येतो, म्हणून मला तुमच्यापेक्षा जास्त विश्रांतीची गरज म्हणून तिथे क्षेत्ररक्षण करा”.
हेही वाचा : T20 Mumbai League : मुंबई फाल्कन्सचा ट्रायम्फ नाईट्सवर विजय; श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादववर पडला भारी..
Rohit Sharma got emotional when he started telling the story of how he and Cheteshwar Pujara used to have funny fights over field placements when they played Cricket together.❤️
Just how fast the night changes.🥺 pic.twitter.com/1IFShvktlk
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) June 7, 2025
यावर पुजारा हसला आणि हसत रोहितला थांबवत म्हणाला की, “पण नंतर जेव्हा रोहितने कसोटीत ओपनिंग करायला सुरुवात केली तेव्हा सगळं काही बदललं. मग तो म्हणाला की आता मी सलामीवीर आहे, म्हणून तू शॉर्ट लेगवर उभा राहा! माझ्याकडे तेव्हा काही उत्तर नव्हते- मी फक्त जाईन.”
हेही वाचा : IND Vs ENG : ‘रोहित-विराटशिवायही विजय मिळवू..’, टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराचे धाडसी विधान
दोन्ही खेळाडूंनी २०१२ ची आणखी एक मनोरंजक घटना सांगितली. जेव्हा हे दोन्ही खेळाडू भारत-अ संघासोबत त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये खेळण्यासाठी गेले होते. रोहितने सांगितले की पुजारा रात्री उशिरा शाकाहारी जेवणाच्या शोधात हॉटेलमधून बाहेर पडला होता, तर सर्व खेळाडूंना रात्री ९ नंतर बाहेर न जाण्यास सांगण्यात आले होते. हॉटेलमधून बाहेर पडताच त्याला गर्दीने वेढले होते, त्याला मोठ्या कष्टाने वाचवण्यात आले.