Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टीम इंडियासाठी 11 कोटींची घोषणा; पहिल्यांदाच विधान भवनात विश्वचॅम्पियन खेळाडूंचा सन्मान

विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे चार खेळाडू मुंबईकर असल्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियासाठी 11 कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 05, 2024 | 07:37 PM
Chief Minister Eknath Shinde announces 11 crores foe india

Chief Minister Eknath Shinde announces 11 crores foe india

Follow Us
Close
Follow Us:

CM Eknath Shinde Announces 11 Crores Prize for Team India : महाराष्ट्रातील विधान भवनात पहिल्यांदाच विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाचा सन्मान करण्यात आला. यावेळी खास करून महाराष्ट्रीयन मुंबईकर असलेल्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांचा सन्मान कऱण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाचे कौतुक करताना मुंबईकर असलेल्या या चार खेळाडूंचा आम्हाला आनंद आणि अभिमान असल्याचे सांगितले. यानंतर टीम इंडियाला 11 कोटींचे बक्षीस देखील जाहीर केले. काल अगोदरच या चार खेळाडूंना 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. आता पुन्हा एकदा टीम इंडियासाठी 11 कोटींची घोषणा केली.

पहिल्यांदाच विधान भवनात सत्कार

#WATCH | Mumbai | Team India captain Rohit Sharma speaks in Maharashtra Vidhan Bhavan as Indian men's cricket team members are being felicitated by CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis (Source: Maharashtra Assembly) pic.twitter.com/I51K2KqgDV — ANI (@ANI) July 5, 2024

विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस
विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडताना दिसत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांच्या बक्षीसाची आधीच घोषणा केली होती. यानंतर राज्य सरकारकडून टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. या चारही खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आणखी मोठी घोषणा करीत टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

भारतीय संघाचे काल मुंबईत दणक्यात स्वागत

आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी अख्खी मुंबई क्रिकेटमय झाली होती. संपूर्ण वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी भरलेले होते. मरीन ड्राईव्हवरसुद्धा क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. तर वानखेडे स्टेडियमवर एवढी गर्दी झाली की, अखेर वानखेडे स्टेडियमचे गेट बंद केले होते. वानखेडे स्टेडियममध्ये जागा नसली तरीही चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत 2 किमी. अंतरात विजयी परेड निघाली होती. या मिरवणुकीत क्रिकेटप्रेमींनी विक्रमी गर्दी करीत खेळाडूंनासुद्धा आश्चर्याचा धक्का दिला होता.

मुख्यमंत्र्यांकडून खेळाडूंना आश्वासन

यावेळी एकनाथ शिंदे यांनी सूर्यकुमारला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागेल, असे बजावलं. तर सूर्यकुमारने पुढचा वर्ल्ड कप देखील जिंकून आणू, असं आश्वासन आज विधान भवनमधील कार्यक्रमात दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. “रोहित आणि सूर्यकुमार यांनी सांगितलं की, मुंबईत एमएमआरमध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत. त्यासाठी जे काही आवश्यक सहकार्य असेल, जागा असेल, जी काही आवश्यक मदत असेल ते सरकार आपल्याला करेल. कारण तुम्ही खेळाडूंची फॅक्टरी निर्माण करणारे खेळाडू आहेत”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी याबाबतही महत्त्वाची घोषणा केली.

Web Title: Cm eknath shinde announces 11 crores as prize for team india world champion players honored in vidhan bhavan for first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 07:25 PM

Topics:  

  • Shivam Dube
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 
1

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 

IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी
2

IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी

IND VS NZ 2nd T20 : पत्नीच्या सल्ल्याने पालटला दिवस! 23 डावांनंतर फॉर्ममध्ये परतलेल्या कर्णधाराने केला खुलासा; पहा VIDEO
3

IND VS NZ 2nd T20 : पत्नीच्या सल्ल्याने पालटला दिवस! 23 डावांनंतर फॉर्ममध्ये परतलेल्या कर्णधाराने केला खुलासा; पहा VIDEO

IND VS NZ 2nd T20l Match : टी२० मध्ये भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला! धावांचा पाठलाग करताना केला ‘हा’ पराक्रम 
4

IND VS NZ 2nd T20l Match : टी२० मध्ये भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला! धावांचा पाठलाग करताना केला ‘हा’ पराक्रम 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.