कोका-कोला इंडिया आणि आयसीसी : यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी मेन्स T२० वर्ल्ड कप २०२४ च्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवला आणि प्रतिष्ठित स्पर्धेचा विजेता ठरला. कोका-कोला इंडिया आणि आयसीसीने क्रिकेटप्रती आवड आणि शाश्वततेप्रती कटिबद्धतेला एकत्र करत पुन्हा एकदा उत्साहवर्धक बदल घडवून आणला आहे.
यंदा मेन्स T२० वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यांदरम्यान ‘मेड इन इंडिया’ राष्ट्रीय ध्वज आणि क्रिकेट संबंधित ४ गूड ध्वज पाहायला मिळाल्या. ज्या ग्राहकांच्या वापरानंतर रिसायकल केलेल्या पीईटी बॉटल्सपासून डिझाइन करण्यात आले होते. कचरा आणि प्लॅस्टिक बॉटल्स रिसायकल करून तयार करण्यात आलेल्या या पीईटी बॉटल्सना पॉलिस्टर फॅब्रिक आणि रिसायकल धाग्यामध्ये बदलण्यात आले. स्टेडियम्समध्ये राष्ट्रगीत समारोहादरम्यान अभिमानाने हे ध्वज प्रदर्शित करण्यात आले.
कोका-कोला इंडियाने प्रथम २०२३ मध्ये आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान रिसायकल केलेले पीईटी राष्ट्रीय ध्वज सादर केले होते. जेथे क्रिकेटमध्ये हे ध्वज सादर करणारी जगातील पहिली कंपनी बनली. मार्की इव्हेण्टदरम्यान विविध हरित उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावी, शाश्वत प्रयत्न केल्यानंतर कोका-कोला इंडियाने सहभागी २० देशांच्या या राष्ट्रीय ध्वजांना डिझाइन करत पर्यावरणाप्रती जबाबदारी कायम राखली आहे. हे लांबी ३५ मीटर आणि रूंदी २० मीटर असलेले जगातील सर्वात मोठे ध्वज आहेत, तसेच नऊ आयसीसी क्रिकेट ४ गुड ध्वज देखील डिझाइन केले.
याव्यतिरिक्त, थम्स अप आयसीसी मेन्स T२० वर्ल्ड कप २०२४ साठी ऑफिशियल बेव्हरेज आणि स्पोर्टस् ड्रिंक पार्टनर होती. नुकतेच, कोका-कोलाने आयसीसीसोबत आपला सहयोग वाढवला आहे, जेथे २०३१ पर्यंत आयसीसी इव्हेण्ट्ससाठी जागतिक सहयोगी म्हणून सेवा देणार आहे. या नवीन सहयोगासह तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी कोका-कोलाचा पाठिंबा अधिक दृढ झाला आहे, ज्यामधून जगभरातील क्रीडावर दीर्घकालीन शावत प्रभावाची खात्री मिळते.
गो रिवाइज बाय गणेश इकोव्हर्स लिमिटेड आणि त्यांच्या सहयोगींनी जवळपास ११,००० पीईटी बॉटल्सना रूपांतरित करून प्रत्येक राष्ट्रीय ध्वज आणि २,००० बॉटल्सना रूपांतरित करून प्रत्येक आयसीसी क्रिकेट ध्वज डिझाइन केले आहेत. या ध्वजांसाठी पॅकेजिंग देखील रिसायकल केलेल्या मटेरिअलपासून बनवण्यात आले आहे. ज्यामधून शाश्वततेप्रती सर्वांगीण दृष्टीकोन दिसून येतो. तसेच, हे सर्व ध्वज ग्लोबल रिसायकल्ड स्टॅण्डर्ड (जीआरएस) प्रमाणित आहेत, रिसायकल्ड कन्टेन्ट, सामाजिक आणि पर्यावरणीय पद्धती आणि केमिकल निर्बंधांसाठी आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करतात. वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक एआय सॉर्टिंग सिस्टम्सनी कचरा वेगळा करण्याची कार्यक्षमता वाढवली आहे. ज्यामुळे संसाधन रिकव्हरीमध्ये वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, कलेक्शन सिस्टम्सनी महिलांसह ५०,००० हून अधिक कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्षम केले आहे. या भव्य ध्वजांना प्रत्यक्षात आणण्यासाठी ६०० कर्मचाऱ्यांची समर्पित टीम तयार करण्यात आली. हा प्रत्येक ध्वज ६० टक्के कमी कार्बन उत्सर्जन करतो, तसेच शेकडो किलोग्रॅम कचरा लँडफिलमध्ये जाण्याला प्रतिबंध होतो आणि जीवाश्म-इंधन आधारित संसाधनांवरील अवलंबन कमी करतात.
कोला-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट इंडिया (आयएनएसडब्ल्यूए) साठी सीएसआर आणि सस्टेनेबिलिटीचे वरिष्ठ संचालक राजेश अयापिल्ला म्हणाले, ”कोका-कोलामध्ये आम्हाला क्रिकेटप्रती आवड आणि आयसीसी मेन्स T२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये शाश्वततेप्रती आमच्या कटिबद्धतेला एकत्र करण्याचा आनंद होत आहे. या रिसायकल केलेल्या पीईटी ध्वजांमधून चक्रियता आणि पर्यावरणीय जबाबदारीप्रती आमची समर्पितता दिसून येते. ग्राहकांनी वापरलेल्या प्लॅस्टिक बॉटल्सना राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेल्या ध्वजांमध्ये बदलत आम्ही चाहत्यांना प्रशंसित करतो आणि हरित भविष्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहोत. आमचा विश्वास आहे की, हा उपक्रम भावी इव्हेण्ट्ससाठी आदर्श ठरेल आणि सकारात्मक परिवर्तनाला प्रेरित करत राहिल.”
आयसीसी चीफ कमर्शियल ऑफिसर अनुराग दहिया म्हणाले, ”आयसीसी वर्ल्ड कप पुन्हा एकदा कोका-कोला इंडिया आणि आयसीसीमधील सहयोग दाखवण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म ठरला आहे, ज्यामधून क्रिकेट आणि पर्यावरणाप्रती आमची समान कटिबद्धता दिसून येते. ‘मेड इन इंडिया’ रिसायकल केलेले पीईटी ध्वज आमच्या उत्साहवर्धक सहयोगाचा प्रबळ उपक्रम होता. या ध्वजांनी राष्ट्रगीत समारोहादरम्यान उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले, तसेच नाविन्यता क्रिकेटमध्ये शाश्वततेला कशाप्रकारे चालना देऊ शकते हे देखील दाखवले.”
गो रिवाइजचे संस्थापक यश शर्मा म्हणाले, ”आमची वापरलेल्या प्रत्येक बॉटलला कुशलपणे रिसायकल करत उच्च महत्त्व असलेल्या उत्पादनांमध्ये बदलण्याचे आणि आमच्या संसाधनांना नवीन जीवन देण्याचे मिशन आहे. आयसीसी वर्ल्ड कप चाहते त्यांच्या देशांना पाठिंबा देत असताना संपूर्ण जगाने भारतातील क्रीडा, तसेच पोस्ट-कंझ्युमर कचऱ्याचे रिसायकल करण्यामधील तंत्रज्ञान क्षमता आणि रिसायकल केलेल्या पीईटी बॉटल्सपासून बनवलेल्या ध्वजांच्या माध्यमातून शाश्वतता आणि खेळाडूवृत्तीचे प्रतीक डिझाइन करण्याप्रती १०० हून अधिक पुरूष आणि महिला कारागिरांची कला पाहिली. आम्हाला कोका-कोलासोबत त्यांची क्रीडामधील शाश्वततेला अधिक दृढ करण्याप्रती कटिबद्धता कायम ठेवण्यासाठी सहयोग करण्याचा अभिमान वाटतो.”
या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून कोका-कोला इंडिया आणि आयसीसी शाश्वत भविष्याला चालना देण्यासोबत क्रिकेटप्रेमींना पर्यावरणीय स्थिरतेप्रती मोहिमेमध्ये सामील होण्यास प्रेरित देखील करत आहेत.