Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

मोहम्मद शमीने आपल्या धारदार गोलंदाजीने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळताना शमीने तब्बल ८ गडी बाद करत बंगालला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 17, 2026 | 10:03 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! (Photo Credit- X)

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोहम्मद शमीची आग ओकणारी गोलंदाजी!
  • ८ गडी बाद करत अगरकर आणि BCCI चं टेन्शन वाढवलं
  • पुनरागमनासाठी ठोकला दावा
Mohammad Shami Eight Wicket Haul: भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) रणजी करंडक २०२५-२६ च्या उपांत्य फेरीत आपल्या धारदार गोलंदाजीने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळताना शमीने तब्बल ८ गडी बाद करत बंगालला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. ३५ वर्षीय शमीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत आगामी श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय निवड समितीचे दरवाजे जोरात ठोठावले आहेत.

करकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल

बंगालच्या ३२८ धावांच्या प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरचा संघ मोठ्या धावसंख्येकडे कूच करत होता. मात्र, मोहम्मद शमीने ९० धावांत ८ बळी घेत पाहुण्या संघाचा डाव ३०२ धावांवर गुंडाळला. यामुळे बंगालला २६ धावांची निसटती पण मोलाची आघाडी मिळाली. शमीचा यापूर्वीचा सर्वोत्तम विक्रम ७९ धावांत ७ बळी असा होता, जो त्याने आज मोडीत काढला.

An 8️⃣-wicket masterpiece 🫡 Watch 🎥 Mohd. Shami wreaks havoc with his career-best First Class figures of 8/90 🔥 Updates ▶️ https://t.co/QXyCuRIgVM#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/f4F3TYnSWi — BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2026

मोहम्मद शमीचा BCCI ला इशारा! घातक गोलंदाजीने पुन्हा उडवली फलंदाजांची भंबेरी; भारतीय संघात परण्याचा ठोकला दावा 

अजित आगरकर आणि निवड समितीसाठी मोठा संदेश

गेल्या वर्षी पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोहम्मद शमीला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, या ऐतिहासिक कामगिरीनंतर शमीने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि त्यांच्या पॅनेलला एक स्पष्ट संदेश दिला आहे. भारताची पुढील कसोटी मालिका श्रीलंकेविरुद्ध होणार असून, शमीच्या या फॉर्ममुळे त्याच्या निवडीचा दावा आता अधिक मजबूत झाला आहे.

तळाच्या फलंदाजांची दाणादाण

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची शमीची ही १५ वी वेळ आहे. त्याने जम्मू-काश्मीरच्या शुभम खजूरियापासून ते युधवीर सिंहपर्यंत ८ फलंदाजांना तंबूत धाडले. विशेषतः ९ व्या विकेटसाठी आकिब नबी आणि युधवीर सिंह यांनी ६४ धावांची भागीदारी करत बंगालची चिंता वाढवली होती. मात्र, शमीने या जोडीला अवघ्या ७ धावांच्या अंतरात बाद करत बंगालचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. बंगालचे उर्वरित दोन बळी मुकेश कुमारने टिपले.

घरगुती क्रिकेटमध्ये शमीची ‘सुपरफास्ट’ घोडदौड

भारतीय संघातून दुर्लक्षित राहूनही शमीने खचून न जाता घरगुती क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. या हंगामातील त्याची आकडेवारी थक्क करणारी आहे. रणजी ट्रॉफीमध्ये आतापर्यंत एकूण ३६ विकेट्स (सरासरी १६.५२). सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ७ सामन्यांत १६ बळी (बंगालसाठी सर्वाधिक यशस्वी). तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७ सामन्यांत १५ बळी घेतले आहे. आकिब नबीनंतर या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. शमीचा सध्याचा स्ट्राइक रेट ३६.५८ इतका प्रभावी असून तो पूर्णपणे लयीत असल्याचे दिसून येत आहे.

IPL 2026 Retention: “हस, तू लखनऊमध्ये आहेस…”LSG चे मालक संजीव गोयंकांकडून Mohammad Shami चे ‘खास’ स्वागत 

Web Title: Mohammad shami takes 8 wickets increasing tension between agarkar and bcci claims comeback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • bcci
  • Mohammad Shami
  • ranji trophy 2026

संबंधित बातम्या

मोठी घडामोड! INDIA ‘A’ संघात बीसीसीआयने केला बदल; आता ‘या’ जबरदस्त खेळाडूची झाली एन्ट्री
1

मोठी घडामोड! INDIA ‘A’ संघात बीसीसीआयने केला बदल; आता ‘या’ जबरदस्त खेळाडूची झाली एन्ट्री

Mohammed Shami: शामी-हसीन जहाँ वादात मोठा ट्विस्ट! कोर्टाचा निर्णय क्रिकेटपटूसाठी दिलासादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण?
2

Mohammed Shami: शामी-हसीन जहाँ वादात मोठा ट्विस्ट! कोर्टाचा निर्णय क्रिकेटपटूसाठी दिलासादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण?

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट
3

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट

IND vs AFG: नवा कर्णधार, नवा जोश! अफगाणिस्तानविरुद्ध बीसीसीआयने केली Team India ची घोषणा
4

IND vs AFG: नवा कर्णधार, नवा जोश! अफगाणिस्तानविरुद्ध बीसीसीआयने केली Team India ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.