Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएलनंतर आता 'बिग बॅश लीग'ची भारतात एन्ट्री? क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चेन्नई दौरा. जाणून घ्या काय आहे प्लॅन.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 17, 2026 | 09:05 PM
IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता (Photo Credit- X)

IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानला मोठा झटका!
  • IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता
  • BCCI सोबत चर्चा सुरू
Big Bash League in India: क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या (IPL) धर्तीवर जगभरात लोकप्रिय असलेली ऑस्ट्रेलियाची टी-२० लीग, म्हणजेच ‘बिग बॅश लीग’ (BBL) आता भारतात खेळवली जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) २०२६-२७ च्या हंगामातील सलामीचा सामना भारतात आयोजित करण्याच्या विचारात आहे. भारतीय बाजारपेठ आणि येथील अफाट क्रिकेट फॅन्सना आकर्षित करण्यासाठी ही मोठी पाऊले उचलली जात आहेत.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार चाचपणी

‘एसईएन’ (SEN) क्रिकेटच्या रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे दोन वरिष्ठ अधिकारी अलीकडेच भारतात आले होते. त्यांनी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर सामना आयोजित करण्याच्या शक्यतांची चाचपणी केली आहे. जर सर्व काही नियोजनानुसार घडले, तर भारतीय चाहत्यांना घरबसल्या ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज लीगचा अनुभव घेता येईल.

🚨 BIG BASH LEAGUE IN INDIA. 🚨 – Cricket Australia contemplating to kick off the next season the Big Bash League in Chennai to attract Indian market. (SEN Cricket). pic.twitter.com/Fg2dUnhomN — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 17, 2026

पर्थ स्कॉचर्स: जगातील सर्वात यशस्वी टी-२० संघ

बिग बॅश लीगच्या २०२५-२६ हंगामात पर्थ स्कॉचर्सनेअंतिम फेरीत सिडनी सिक्सर्सचा ६ गडी राखून पराभव केला होता. या विजयासह पर्थ स्कॉचर्सने विक्रमी सहाव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. आता हा संघ जगातील कोणत्याही टी-२० लीग मधील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. जर हा सामना भारतात झाला, तर डिफेंडिंग चॅम्पियन पर्थ स्कॉचर्स चेन्नईत खेळणारा पहिला संघ असू शकतो.

बीसीसीआय आणि ब्रॉडकास्टर्सची मंजुरी आवश्यक

हा प्रकल्प अद्याप प्राथमिक टप्प्यावर असून, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) परवानगी घेणे अनिवार्य आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केवळ बीसीसीआयच नव्हे, तर अधिकृत ब्रॉडकास्टर्स आणि इतर भागधारकांशीही संवाद साधावा लागेल. रिपोर्टनुसार, भारतीय गुंतवणूकदारांनी देखील या लीगमध्ये स्वारस्य दाखवले आहे. दक्षिण आशियाई चाहत्यांना लीगशी जोडून घेण्यासाठी हा एक मोठा ‘मास्टर प्लॅन’ मानला जात आहे. भविष्यात दरवर्षी तामिळनाडूमध्ये किमान एक तरी बीबीएल सामना आयोजित करण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा विचार आहे.

जागतिक स्टार खेळाडूंचा भरणा आणि अश्विनचे कनेक्शन

बिग बॅश लीग ही आयपीएलनंतरची दुसरी सर्वात लोकप्रिय लीग मानली जाते. यामध्ये ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेशचे दिग्गज खेळाडू खेळतात. गेल्या हंगामात भारताचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन सिडनी सिक्सर्सकडून खेळणार होता, मात्र दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. आता बीबीएलचे सामने भारतात झाल्यास, स्थानिक चाहत्यांमध्ये या लीगची क्रेझ अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Big blow to pakistan the most popular league after ipl is likely to be played in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Australia
  • bcci
  • Big Bash League
  • cricket news
  • IPL

संबंधित बातम्या

प्रशांत महासागरात चीनची घातक खेळी! अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; इंडो-पॅसिफिकमध्ये चिंता वाढली
1

प्रशांत महासागरात चीनची घातक खेळी! अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; इंडो-पॅसिफिकमध्ये चिंता वाढली

PM Modi Foreign Visit : PM मोदींच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात; संरक्षण, गुंतवणूक आणि FTA वर होणार महत्त्वपूर्ण चर्चा
2

PM Modi Foreign Visit : PM मोदींच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात; संरक्षण, गुंतवणूक आणि FTA वर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Ellyse Perry 9 ICC Trophies: एलिस पेरीचा धमाका! 9 वेळा ICC ट्रॉफीवर नाव कोरून रचला इतिहास
3

Ellyse Perry 9 ICC Trophies: एलिस पेरीचा धमाका! 9 वेळा ICC ट्रॉफीवर नाव कोरून रचला इतिहास

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद
4

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.