फिफा विश्वकप स्पर्धेत (FIFA World Cup) अर्जेंटिनानं फ्रान्सवर मात करत जेतेपद पटकावलं. यानंतर आता जगभरात फक्त तेव्हापासून अर्जेंटिना आणि त्याचा कर्णधार लियोनेल मेस्सी तेव्हापासून अर्जेंटिना आणि त्याचा कर्णधार लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. यांची चांगलीच चर्चा होत आहे. जगभरातून लियोनेल मेस्सीवर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता आसाममधील एका काँग्रेस खासदारानं मेस्सीसंदर्भात केलेलं वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आसाममधील एका काँग्रेस खासदार आसाम काँग्रेसचे खासदार अब्दुल खालिक (Congress MP Abdul Khaliq) यांनी जगजेत्ता लियोनेल मेस्सीचं आसाम सोबत असलेलं कनेक्शन शोधून काढलं आहे. यांनी ट्विटरवर मेस्सीचं अभिनंदन केलं आणि लिहिलं की, तुमचं मनापासून अभिनंदन, आम्हाला तुमच्या आसाम (Aasam) कनेक्शनचा अभिमान आहे. खालिक यांनी मेस्सीच्या आसाम कनेक्शनबाबत उल्लेख केल्यानंतर एका युजरनं नेमकं मेस्सी आणि आसामचं कनेक्शन काय? अशी विचारणा त्यांना केली. त्यावेळी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचा जन्म भारताच्या आसाममध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला. त्याच्या या ट्वीटनंतर यूजर्स खालिक यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहेत.त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर सगळीकडे आता चर्च रंगू लागल्या आहेत. त्यामुळे मेस्सीचं ॉ मेस्सीचा भारताशी संबंध जोडणंच काँग्रेसच्या खासदाराला महागात पडलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं आहे.