सप्टेंबरमध्ये होणाऱ्या IND Vs BAN कसोटी सामन्याच्या निवडीबाबत सर्फराज खानचे मोठे भाष्य; म्हणाला...
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सिरीज सप्टेंबर महिन्यात खेळली जाणार आहे. १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान पहिली टेस्ट मॅच होणार आहे. तर दुसरी मॅच २७ तारखेपासून सुरू होणार आहे. दरम्यान या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड होणे बाकी आहे. दरम्यान या सिरीज आधी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सर्फराज खान याने त्याच्या निवडीबाबत भाष्य केले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या टेस्ट मॅचमध्ये सर्फराज खानला संधी मिळाली होती. मात्र बांगलादेश दौऱ्यात त्यातला संधी मिळणार की नाही याबाबत सर्फराज खान काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये संधी मिळाल्यानंतर सर्फराज खानने तीन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तीन सामन्यात त्याने २०० पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. मात्र बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यांत त्याला संधी मिळेल की नाही याची त्याला खात्री नसल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत त्याने एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुल खेळत नव्हते. आता हे दोघेही भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. त्यावरून बांगलादेश सिरीजमधील निवडीबाबत त्याने भाष्य केले आहे. सर्फराज म्हणाला, ”माझी निवड होईल अशी मला अजिबात अपेक्षा नाही. मात्र निवड झाल्यास मी पूर्णपणे तयार आहे.देशांतर्गत किर्केटमध्ये सर्फराजने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ही गोष्ट माझ्या फायद्याची ठरू शकते असे सर्फराज म्हणाला आहे. काही खेळाडूंना लगेच संधी मिळते. तर काही खेळाडूंना वाट बघावी लागते. मी पहिली टेस्ट मॅच खेळलो तेव्हा पहिले तीन बॉल मी थोडा स्थिर नव्हतो. मात्र नंतर मी पूर्ण नियंत्रणात होतो. जे मी देशांतर्गत क्रिकेट खेळताना करायचो तेच मी टेस्ट मॅच खेळताना करत होतो.”