
Will Cristiano Ronaldo's World Cup dream be shattered? Star footballer faces three-match ban
Cristiano Ronaldo likely to face three-match ban : फुटबॉल विश्वातुन मोठी बातमी समोर आली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंग होऊ शकते. कारण, डब्लिन येथे गुरुवारी झालेल्या विश्वचषक पात्रता सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोला मिळालेल्या रेड कार्डमुळे २०२६ विश्वकपच्या पहिल्या सामन्यांवर बंदीचा धोका निर्माण झाला आहे. आयरलंडविरुद्धच्या या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये रोनाल्डोने डिफेंडर दारा ओ’शे यांना कोपर मारल्यामुळे त्यांना मैदानाबाहेर पाठवण्यात आले. या सामन्यात पोर्तुगालला ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला रोनाल्डो आर्मेनियाविरुद्ध रविवारी होणाऱ्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाहीत. या सामन्यात विजय मिळाल्यास पोर्तुगालला अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या २०२६ विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची संधी आहे.
हेही वाचा : महिला क्रिकेटसाठी नव्या पर्वाची नांदी! Women Cricket World Cup विजयानंतर केंद्रीय करारांमध्ये होणार सुधारणा
फीफाच्या नियमांनुसार ‘गंभीर बेईमानी’ साठी किमान दोन सामन्यांची तर ‘हिंसक आचरणा’ साठी किमान तीन सामन्यांची बंदी आवश्यक असते. रोनाल्डोने केलेल्या कृतीला जर ‘हिंसक’ मानले गेले तर त्यांच्यावर तीन सामन्यांची बंदी लागू शकते. ही बंदी फक्त स्पर्धात्मक सामन्यांवर लागू होते; सराव सामन्यांवर नाही.
अवीवा स्टेडियमवर आयरलंड २-० अशी आघाडी राखून असताना रोनाल्डोने ओ’शे यांच्या पाठीवर कोपर मारला. प्रथम रेफरीने त्यांना पिवळा कार्ड दिले; मात्र व्हिडीओ रिव्ह्यूमध्ये हा निर्णय बदलत रेड कार्ड देण्यात आले. मैदानाबाहेर जाताना आयरलंडच्या चाहत्यांच्या हूटिंगवर रोनाल्डोनं कटाक्षाने टाळ्या वाजवून दोन्ही अंगठे उंचावून प्रतिक्रिया दिली. रोनाल्डो फेब्रुवारीत ४१ वर्षांचे होणार असून सहाव्या विश्वचषकात खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या घटनेमुळे त्यांच्या स्वप्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा : IND vs SA 1st Test : KL Rahul ने गाठला मोठा टप्पा! भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा केल्या पूर्ण
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. यासह, केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा गाठला आहे. केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ही कामगिरी केली आहे.