Croatian player creates sensation in cricket world! He becomes the first cricketer to achieve 'this' in international cricket with world record
Croatian all-rounder Zach Vukusic breaks world record : क्रोएशियाच्या एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने आपल्या वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी इतिहास रचला आहे. जॅक वुकुसिक असे विश्वविक्रम रचणाऱ्या खेळाडूचे नाव आहे. त्यांचे वय १७ वर्षे आणि ३११ दिवस असून तो या वयात क्रिकेट इतिहासात आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.
जॅक वुकुसिकने मायदेशात सायप्रसविरुद्ध कर्णधारपदाची धुरा सांभाळत ही कामगिरी केली आहे. वुकुसिकने फ्रान्सच्या नोमान अमजदचा विक्रम मोडीत काढला आहे. अमजदने जुलै २०२२ मध्ये १८ वर्षे आणि २४ दिवसांच्या वयात चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात फ्रान्सचे सारथ्य केले होते. दुसरीकडे, कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये, हा विक्रम अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर रशीद खानच्या नावावर जमा आहे, ज्याने मार्च २०१८ मध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात आपल्या देशाची धुरा सांभाळताना वयाच्या १९ वर्षे आणि १६५ दिवसांत या विक्रमाला गवसणी घेतली होती.
हेही वाचा : PAK vs WI: बाबर आझमला विक्रमांची नामी संधी! दोन शतके लगावाताच बनेल पाकिस्तान क्रिकेटचा बेताश बादशाह..
कर्णधार असताना, वुकुसिकची कर्णधार म्हणून कामगिरी चांगली राहिली नाही. क्रोएशियाने सायप्रसविरुद्ध खेळलेले दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागाल आहे. दोन्ही सामने जॅक वुकुसिकच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आले होते.
पहिल्या सामन्यात, सायप्रसने झाग्रेबमधील म्लाडोस्ट क्रिकेट मैदानावर २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात २१३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, क्रोएशिया संघ ६ विकेट्स गमवून १५५ धावाच करू शकला होता. १५५/६ वर आटोपला आणि सायप्रसने ५८ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात, क्रोएशियाने प्रथम फलंदाजी केली आणि हा संघ १३२ धावांवर गारद झाला. कमी लक्ष्य सायप्रसने १५.५ षटकांत सात गडी गमावून पूर्ण केले.
वैयक्तिक पातळीवर वुकुसिकच्या कामगिरीकडे नजर टाकली तर त्याने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात तो त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये महागडा ठरला होता. त्याने एका विकेटसाठी ४१ धावा मोजल्या होत्या. परंतु त्याने बॅटने ४३ धावांची खेळी केली. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला. दुसऱ्या सामन्यात, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने १९ चेंडूत २३ धावा फटकावल्या आणि चेंडूने कमाल करत त्याने तीन षटकांत १० धावा देत २ बळी देखील घेतले.