मॅथ्यू फोर्ड(फोटो-सोशल मीडिया)
PAK vs WI : आज म्हणजेच ८ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिकेला सुरवात होते आहे. या मालिकेपूर्वीच वेस्ट इंडि संघाला मोठा झटका बसला आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू फोर्ड दुखापतग्रस्त झाला असून तो पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. आयसीसीकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे.
बुधवारी सराव सत्र सुरु होते. यावेळी कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मॅथ्यू फोर्डच्या डाव्या खांद्याच्या हाडाला दुखापत झाली होती. असा अंदाज आहे की, त्याचा डावा खांदा निखळला असावा. त्यामुळे तो या मालिकेतूनच बाहेर पडला आहे. हा वेस्ट इंडिजचा मोठा झटका मानला जात आहे. आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून त्याच्या जागी बदलीची घोषणा करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजने नवीन खेळाडू जोहान लेनचा संघात समावेश केला आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना शुक्रवारपासून त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे.
हेही वाचा :
लेनची दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध दमदार कामगिरी
मॅथ्यू फोर्डच्या जागी वेस्ट इंडिजच्या संघात स्थान मिळालेल्या जोहान लेनने दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध शानदार कामगिरी केलीय आहे. त्याचे बक्षीस म्हणून या वर्षीय लेनला आता वेस्ट इंडिज अ संघातून मुख्य संघात स्थान दिले गेले आहे. तो आणखी एक वेगवान गोलंदाज म्हणून कॅरेबियन संघाला मजबुती प्रदान करेल. वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी याने विश्वास व्यक्त केला आहे की, पाकिस्तानविरुद्धची मालिका २०२७ मध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रता मिळविण्याच्या तयारीसाठी चांगली सुरुवात ठरणार आहे.
विश्वचषकासाठी पात्रता मिळविण्यासाठी वेस्ट इंडिजचे असणार प्रयत्न
आयसीसीच्या मते, वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमीने म्हटले आहे की, पाकिस्तानसारखा संघ २०२७ च्या विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये वेगळ्या प्रकारचे आव्हान घेऊन येत असतो. स्टिच तो म्हणाला की, जरी सध्याचे ध्येय पात्रता मिळवणे असले तरी, दीर्घकाळासाठी यशस्वी होण्यासाठी संघात विजयाची भावना आणि एकता राखणे खूप महत्वाचेया असणार आहे.
डॅरेन सॅमी पुढे म्हणाला की, पाकिस्तानसारख्या अव्वल क्रमांकाच्या संघांविरुद्धचे सामने खेळने विश्वचषकापूर्वी आपले स्थान सुधारण्यासाठी एक चांगली संधी आहेत, कारण यामध्ये जिंकल्याने आपल्याला मौल्यवान रँकिंग गुण मिळण्याची शक्यता असते.
पाकिस्तानविरुद्ध वेस्ट इंडिज संघ खालीप्रामाणे
शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जेडिया ब्लेड्स, केसी कार्टी, रोस्टन चेस, जस्टिन ग्रीव्हज, आमिर जांगू, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, जोहान लेन, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रुदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड
हेही वाचा :
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना: ८ ऑगस्ट, त्रिनिदाद.
दुसरा एकदिवसीय सामना: १० ऑगस्ट, त्रिनिदाद.
तिसरा एकदिवसीय सामना: १२ ऑगस्ट, त्रिनिदाद.